देशाला कलावंताचे योगदान विसरता येणार नाही -नानाभाऊ पंचबुध्दे

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठान तथा राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने प्रगती महिला महाविद्यालय येथे दिनांक २८ आॅगस्ट २०२६ रोज शुक्रवारला दुपारी १२वाजता कलावंतांच्या भंडारा जिल्हा बैठकिचे आयोजन प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठान चे विदर्भ प्रदेश अध्यक्ष तथा राष्ट्रवादी कांग्रेस चे प्रदेश सांस्कृतिक विभागाचे महासचिव महेंद्र वाहाणे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. या सभेला मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माजी शिक्षणमंत्री नानाभाऊ पंचबुध्दे, प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल, जिल्हा उपाध्यक्ष प्रशांत देशकर, डॉ बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष महादेव मेश्राम, शहर अध्यक्ष हेमंत महाकाळकर, कलावंत संगठनेचे जिल्हा अध्यक्ष प्यारेलाल उच्चीबगले इत्यादि मान्यवर मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा गांधी, भारतिय राज्यघटनेचे शिल्पकार प. पु. बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलीत करण्यात येवून त्याना अभिवादन करण्यात आले. व कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या प्रसंगी राखी या सणाचे औचित्य साधून सर्व उपस्थित असलेल्या कलाकार भगिनिंनी मान्यवरांना राखी बांधुन कलेचे जतन करण्यचे व कलावंत महिला भगिनींनीचे हित जोपासण्याचे आव्हान केले. या प्रसंगी माजी राज्यमंत्री नानाभाऊ पंचबुध्दे कलावंतांना मार्गदर्शन करतांना म्हणाले कि, देशात अनेक मोठ मोठे कलावंत झाले, त्या कलावंतांनी देश पारतंत्र्यात असतांना आपल्या कलेचे माध्यमातुन जनजागृती केली व देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात महत्वाची भुमिका बजावली. मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांनी कलावंतांना मोलाचे मार्गदर्शन करुन जमेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे अध्यक्ष महेंद्र वाहाणे संबोधन करतांना म्हणाले की, ब-याच वर्षापासुन प्रतिष्ठित कलावंत प्रतिष्ठान हि कलावंत संगठना कलावंताचे हित जोपासण्याचे कार्यकरत असुन कलावंतांच्या न्याय हक्कासाठी प्रसंगी धरने आंदोलने करुन कलावंतांना न्याय मिळवून देण्याचे कार्य संम्पुर्ण महाराष्ट्र राज्यभर करीत आहे. आम्ही या संगठनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते नेहमिच कलावंतांच्या न्याय हक्कासाठी लढा देत आहोत. या कार्यक्रमाची प्रस्तावना प्रशांत देशकर यांनी केली संचालन रा. कां, सांस्कृतिक विभागाचे राजेश वासनिक यांनी केले तर आभार प्रदर्शन प्यारेलाल उच्चीबगले यांनी केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रमेश लुटे, श्रीराम बोरकर, महेमुद खान, लियात खान, सिध्दार्थ लोणारे, शैलेंद्र मेश्राम, राजकुमार वाहाणे, अविनाश गजभिये, शिवदास वाहाणे, भिमशंकर गजभिये, घनश्याम कोसरे, माधव भोयर, अंकुश मेश्राम, निरंजन शेंन्डे नानोबा बागडे, गुरुदेव मेश्राम, राहुल चवळे, संतोष वैरागडे, छन्नुताई नंदेश्वर, सुनिता आगलावे, गितांजली घरडे, भुमिता लोणारे, चंद्रकला मेश्राम, उर्मिला जगनाडे, जिजा धुमनखेडे, माधुरी कोसरे, वंदना लोणारे, रुपाली दिघोरे, सुनिता लोणारे इत्यादी कलावंत मंडळींनी मोलाचे सहकार्य केले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *