धानाला बोनस द्या; चार तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करा!

शरद पवारांच्या १७ मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी करा ! चरण वाघमारे यांची मागणी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

भंडारा : राज्य शासनाने जाहीर केलेल्या दुष्काळग्रस्त तरतुड्यांच्या यादीत भंडारा जिल्ह्यातील काही तालुक्यांचा समावेश केला असला, तरी तुमसर, मोहाडी, लाखांदूर आणि साकोली या चार तालुक्यांना वगळण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. शासनाच्या निर्णयाविरोधात शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी आंदोलन करून संताप व्यक्त केला असून जिल्ह्यातील वगळण्यात आलेल्या चार तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावे, धानाला तात्काळ बोनस देण्यात यावा तसेच दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण भागासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारसमोर मांडलेल्या १७ मागण्यांची भंडारा जिल्ह्यात तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी अशी मागणी पक्षाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार चरण वाघमारे यांनी पत्रकार परिषदेतून केली.

तुमसर व मोहाडी तालुक्यात पिकांचे मोठे नुकसान झाले असतानाही सरकारने दोन्ही तालुक्यांना दुष्काळग्रस्तांच्या यादीतून वगळण्यात मोठा संताप व्यक्त केला जात आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाच्या भंडारा जिल्हा शाखेच्या वतीने तुमसर आणि मोहाडी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थितीची पाहणी करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी धान पिकांचे नुकसान, पाण्याची टंचाई, उत्पादनातील घट आणि दुष्काळच्या निकषांमुळे निर्माण झालेल्या अडचणींबाबत माहिती दिली. त्यामुळे कागदावरील आकडेवारीपेक्षा प्रत्यक्ष बांधावरील परिस्थितीचा विचार करून दुष्काळग्रस्त तालुक्यांचा फेर-आढावा घेण्याची गरज असल्याचे चरण वाघमारे यांनी म्हटले आहे.

पत्रकार परिषदेला जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे, जि.प.सदस्य संदीप ताले, शहर अध्यक्ष मधुकर चौधरी, चंद्रशेखर भिवगडे, पवनी तालुका अध्यक्ष घनश्याम वंजारी, विनायक मारवाडे, गुरुदेव भोंडे उपस्थित होते.

शरद पवार यांनी सरकारकडे केलेल्या मागण्या….

१) वंचित तालुके दुष्काळग्रस्त घोषित करावेत. २) संपूर्ण जमीन महसूल माफ करावा. ३) शेती व शेतीशी निगडित कर्जमाफी करावी. ४) कृषी पंपांचे सर्व वीजबिले माफ करावीत. ५) विद्यार्थ्यांची शैक्षणिक, वसतिगृह व मेस फी माफ करावी. ६) रोजगार हमीची कामे तात्तीने सुरू करावीत. ७) पिण्याचे व जनावरांचे पाणी देण्यासाठी टँकर मंजुरीचे अधिकार तहसीलदारामାନ द्यावेत. ८) कृषी पंपांची वीज खंडित करू नये व लोडशेडिंग करू नये. ९) शेतकरी व शेतमजूर कुटुंबांना दरमहा २५ किलो मोफत धान्य द्यावे. १०) पशुनासाठी थेट बँक खात्यात अनुदान जमा करावे. ११) जलसंधारणाची कामे तात्तीने सुरू करावीत. १२) शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख व शेतमजुरांना २५ हजार रुपये थेट आर्थिक मदत द्यावी. १३) पीक व फळबागांच्या नुकसानाची तात्तीने भरपाई द्यावी. १४) फळबागांसाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा. १५) प्रलंबित वैयक्तिक लाभाच्या योजनांची देयके तात्तीने द्यावी. १६) दुष्काळ निवारणासाठी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा. १७) दुष्काळाच्या प्रश्नावर महाराष्ट्र विधिमंडळाचे तीन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे. १८) धान बोनस तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करून पीक नुकसानाची भरपाई व इतर दुष्काळी मदत दसरा-दिवाळीपूर्वी द्यावी.

पालकमंत्री यांनी शासनाकडे ठोस पाठपुरावा करावा

भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दुष्काळच्या यादीतून वगळलेल्या भागाचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली आहे, या पाहणीपुरते मर्यादित न राहता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तात्तीने निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री व राज्य शासनाकडे ठोस पाठपुरावा करावा, अशी मागणी वाघमारे यांनी केली आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *