धावत्या ट्रकने घेतला पेट

लाखनी पोलीस स्टेशन समोर मोठा अनर्थ टळला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

लाखनी : गोंदियाहून नागपूरकडे लोखंडाचे नट-बोल्ट घेऊन जाणाऱ्या १६ चक्का ट्रकच्या मागील चाकाने अचानक पेट घेतल्याची घटना आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास लाखनी पोलीस स्टेशन समोर घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

प्राप्त माहितीनुसार, ट्रक क्रमांक युपी १४ एटी ७८५५ हा गोंदियाहून नागपूरकडे जात होता. या ट्रकचे चालक प्रमोद कालूराम कुमार (वय २८, रा. टेटा पोस्ट जमालपूर, तलबेहात, ललितपूर, यूपी) हे आहेत.

लाखनी पोलीस स्टेशन समोर आला असता ट्रकच्या पाठीमागील चाकाचे लायनर गरम झाल्याने टायरने अचानक पेट घेतला. चाकातून धूर निघत असल्याचे लक्षात येताच चालकाने प्रसंगवधान राखत ट्रक तात्काळ रस्त्याच्या कडेला उभा केला. घटना पोलीस स्टेशन समोरच घडल्याने पोलिसांनी तात्काळ धाव घेत आग विझवण्यासाठी प्रयत्न केले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने पाणी टाकून आग आटोक्यात आणण्यात आली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

वेळेच आग विझवण्यात आल्याने ट्रकमधील लोखंडी सामान आणि ट्रकचे अधिक नुकसान होण्यापासून बचाव झाला.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *