भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दिनांक २९ जुन २०२६ ला पिंडकेपार टोली येथील उर्वरित प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लावावे या करिता जिल्हाधिकारी सावंत कुमार यांच्या सोबत सकारात्मक चर्चा करत त्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात गावठाण बाहेरील शेत शिवारात किंवा अन्य मालकीच्या जागेवर गावठाण बाहेरील पिंडकेपार टोली राहणारे ३८ कुटुंबाचा पुनर्वसनाचा प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यात यावा ही मागणी करण्यात आली. तसेच महाराष्ट्र पुनर्वसन अधिनियम कायदा १९८६ मधील तरतूद प्रमाणे एखाद्या गावाचा पुनर्वसनकर्त्यावेळी त्या गावात अनेक अनेक वर्षांपासून राहत असणारे भाडेकरू ज्यांच्या स्वत:च्या मालकीचे घर नसतील तरी त्या गावाच्या अनेक अनेक वर्षापासून राहत असणारे मूळ निवासी लोकांचे पुनर्वसन करण्यात यावे अशी कायद्यात तरतूद आहे. त्या तरतुदीच्या अधीन राहून भाडेकरून यांना सुद्धा नवीन गावठाण येथे प्लॉट वितरण करण्यात यावे ही मागणी या निवेदन द्वारे करण्यात आली.
नवीन गावठाण येथे थोर महापुरुषांचे पुतळे स्थापित करण्याकरिता कायदेशीर रित्या परवानगी देण्यात यावी ही सुद्धा मागणी या निवेदन द्वारे करण्यात आले. निवेदन देता वेळी जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस यशवंत सोनूकुसरे, पिंडकेपार गावाचे सरपंच रुपेश आतीलकर, ग्रामपंचायत सदस्य नितीन कहालकर, ग्रामपंचायत सदस्य खंगारताई, राकेश तांबुलकर, मंगेश कंगाले, गाढवेजी, दूधकुवरजी, कार्तिक मते व गावातील मोठ्या संख्येने प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.