पुणे प्रमाणेच भंडारा येथील अत्याचार प्रकरणात न्याय द्यावा!

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : पुणे येथील एका अत्याचार प्रकरणात सरकारने विशेष लक्ष घालुन त्या प्रकरणात अवघ्या ५५ दिवसात प्रकरणाचा निकाल लावुन आरोपीला फाशी ची शिक्षा दिली त्याच प्रमाणे भंडारा येथील अत्याचार प्रकरणात आरोपीला शिक्षा देवुन पिडीतेचा न्याय द्यावा अशी मागणी महाराष्टÑ प्रदेश कॉंग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी केली.आज भंडारा येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ.पटोले म्हणाले,राज्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मोठा गंभीर बनला आहे. राज्यातील जवळपास ८५ हजार महिलामुली या अद्यापही बेपत्ता आहेत. भंडारा येथे एका साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचाराची घटना ही अत्यंत निंदनीय आहे.

विशेष म्हणजे राज्याचे गृहराज्यमंत्री डॉ.पंकज भोयर यांच्याकडे या भंडारा जिल्ह्याचे पालकत्वाची जबाबदारी आहे. त्यांच्याच जिल्ह्यात अशा घटना घडणे म्हणजे जिल्ह्यात गुन्हेगारांमध्ये पोलीसांचा धाक नसल्याचे दिसुन येते हे या सरकारचे अपयश असल्याचे आ.पटोले यावेळी म्हणाले. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात दहा हजार मेट्रीक टन युरीया खत उपलब्ध असल्याचे सांगण्यात येते मग शेतकºयांना खताची टंचाई का भासत आहे. सध्या शेतीचा हंगाम सुरू असुन शेतकºयांना मोठया प्रमाणात खतांची आवश्यकता असतांना जिल्ह्यात खतांचा तुटवडा भासत आहे तर दुसरीकडे शेतकºयांना आवश्यक खतांसाठी अधिकचे पैसे मोजावे लागत असल्याने त्यांनी मोठी लुबाडणुक होत आहे. जिल्ह्यात मोठया प्रमाणात बोगस बि बियानांची विक्री होत असल्याने शेतकºयांनी शेतात लावलेले उगवलेच नाही त्यामुळे शेतकºयांना मोठया नुकसानीला सामोर जावे लागत आहे. जिल्ह्यात कृषी विभागाने जप्त केलेले २१ प्रकारचे बि-बियाने बोगस निघाल्याने शेतकºयांची मोठी आर्थिक फसवणुक झाली आहे.

शासनाने विशेष पथकाची नेमणुक करून जिल्हयातील बोगस बि बियाने विक्री व खतांचा होणारा काळाबाजार यावर कारवाई करण्याची मागणी आ.नाना पटोले यांनी यावेळी केली. जिल्हयातील शेतकºयांनी मोठया प्रमाणात रब्बी (उन्हाळी) धान पिकांची लागवड करीत त्याची शासकीय धान खरेदी केंद्रावर विक्री केली मात्र अद्यापही शेतकºयांना त्या धानाचे चुकारे (पैसे) मिळाले नसुन मका खरेदीचे सुध्दा पैसे शेतकºयांना अद्यापही मिळाले नाही. राज्यातील सरकार कंगाल-भिखारी झाले काय? असा सवालही पटोले यांनी उपस्थित केला. सन २०१९ पासुन म.ग्रा.रो.ह.योे.च्या कामाचे पैसे थकीत असुन सरकारने महात्मा गांधी यांच्या नावाने असलेल्या या योजनेचे नाव बदलुन जीरामजी असे केले.प्रभु रामाच्या नावाने पैसे खाणाºया सरकारने या योजनेला रामा चे नाव देणे हे न समजणारे कोडे आहे असेही नाना पटोले यावेळी म्हणाले.

सरकारने प्रत्येक गावामध्ये ‘हर घर नल-हर घर जल’ योजना आणली मात्र अनेक गावांमध्ये या योजनेचा बोजवारा उडाला असुन अद्यापही नागरीकांना पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे.तर संबंधीत विभागाने ग्राम पंचायत प्रशासनावर दबाव टाकुन काम पुर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मागवुन घेत ते सरकारला सादर करीत आपली पाठ थोपटुन घेतली.मात्र या योजनेमुळे गावातील मोठया प्रमाणात रस्याचे खोदकाम करण्यात आल्याने रस्त्यांची पुर्णपणे चाळण झाली आहे.एकीकडे नळाला पाणी नाही तर दुसरीकडे रस्त्यांची समस्या यामुळे गावातील नागरीकांना मोठया अडचणींचा सामना करावा लागत आहे.या सर्व विषयांना घेवुन सरकारविरोधात कॉंग्रेसतर्फे मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचे आ.नाना पटोले यांनी यावेळी सांगीतले. पत्रकार परिषदेला आ.नाना पटोले, नगरसेवक कमल साठवणे, महिला कॉग्रेसच्या जिल्हाध्यक्षा जयश्री बोरकर, अस्मिता मरगळे, पुजा बाभरे आदि उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *