प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध; राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत जिल्हाधिकाºयांची बैठक

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी

भंडारा : विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत भंडारा जिल्ह्यातील प्रारूप मतदार यादी दि. ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी विविध मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन मतदार यादी पुनरीक्षण कार्यक्रमाबाबत माहिती दिली. जिल्हाधिकारी सावन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली उपजिल्हा निवडणूक अधिकारी विकास व्यवहारे यांनी जिल्ह्यातील सर्व मतदान नोंदणी अधिकारी (ERO), साहाय्यक मतदान नोंदणी अधिकारी (AERO) तसेच अतिरिक्त साहाय्यक मतदान नोंदणी अधिकाऱ्यांना (Additional AERO) विशेष संक्षिप्त पुनर-िक्षण (SIR) फेज ३ व फेज ४ संदर्भात प्रशिक्षण दिले.

प्रशिक्षणामध्ये विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या विविध टप्प्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुढील कार्यवाही करताना मदारियांच्या दावे व हरकती विहित प्रक्रियेनुसार हाताळणे, मतदार यादीतील नोंदीची अचूकता राखणे तसेच सर्व कामकाज विहित कालमर्यादित पूर्ण करणे, याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.

राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी मतदार यादी पुनरीक्षण प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेऊन पात्र नागरिकांची नावे मतदार यादीत समाविष्ट होण्यासाठी तसेच मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी केले.

मतदार यादी ही लोकशाही प्रक्रियेचा महत्त्वपूर्ण आधार असून ती अधिकाधिक अचूक, पारदर्शक व अद्ययावत ठेवण्यासाठी सर्व संबंधित अधिकारी तसेच राजकीय पक्षांनी समन्वयाने कार्य करावे, असे यावेळी नमूद करण्यात आले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *