भूमिगत पुलाला नागरिकांचा तीव्र विरोध

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया:- गोंदिया-बल्लारशा रेल्वे मार्गावर प्रस्तावित असलेल्या भूमिगत पुलाला भीमनगर, कुंभारे नगर परिसरातील नागरिकांनी जोरदार विरोध केला आहे. भूमिगत पुलाऐवजी रेल्वे ओव्हरब्रिज फडइ बांधण्यात यावा या मागणीसाठी आज शेकडो नागरिकांनी मोर्चा काढत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. मागण्या मान्य न झाल्यास धरणे आंदोलनाचा इशाराही आंदोलकांनी दिला आहे.

गोंदिया शहरातील भीमनगर, कुंभारे नगर, सिंगलटोली, सावित्रीबाई वॉर्ड, श्रीनगर आणि चंद्रशेखर वॉर्ड या भागात २० ते २५ हजार नागरिक राहतात. या भागात आधीच मुंबई-हावडा रेल्वे चौकी बंद करून भूमिगत पुल तयार करण्यात आला आहे. मात्र त्या पुलाचा अनुभव नागरिकांसाठी अत्यंत त्रासदायक ठरला आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे की, त्या भूमिगत पुलातून अ‍ॅम्बुलन्स, फायर ब्रिगेड, शाळेची बस आणि मोठी जड वाहने जाऊ शकत नाहीत. शिवाय पावसाळ्यात पुलात पाणी साचल्याने येजा पूर्णपणे बंद होते.

विद्यार्थी, रुग्ण आणि नोकरदारांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते. गोंदिया-बल्लारशा मार्गावर भीमनगर ते कुंभारे नगर दरम्यान असलेली रेल्वे चौकी बंद करून रेल्वे प्रशासनाकडून छऌर अर्थात भूमिगत पुलाचा प्रस्ताव मांडण्यात आला आहे. मात्र आधीच्या अनुभवामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी या प्रस्तावाला तीव्र विरोध दर्शविला आहे. आज भीमनगर येथून शेकडो नागरिकांनी हातात फलक घेऊन मोर्चा काढला. हा मोर्चा उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकला. आंदोलकांनी छऌर ऐवजी रेल्वे ओव्हरब्रिज फडइ उभारण्याची मागणी केली.

राष्ट्रपतींपासून पालकमंत्र्यांपर्यंत निवेदन

आंदोलकांनी भूमिगत पुलाचा विरोध करणारे निवेदन राष्ट्रपती, पंतप्रधान, रेल्वे मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या नावाने उपविभागीय अधिकारी यांच्याकडेसादर केले.

धरणे आंदोलनाचा इशारा

आंदोलकांनी इशारा दिला आहे की, जर भूमिगत पुलाचा निर्णय मागे घेऊन फडइ चा प्रस्ताव मंजूर केला नाही, तर ज्या ठिकाणी पुलाचे काम प्रस्तावित आहे त्या ठिकाणी मोठे धरणे आंदोलन करण्यात येईल.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *