महामंडळे वाटपाचा फैसला १० ते १५ दिवसांत: खा.पटेल

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्यातील विविध महामंडळ व समित्यांच्या गठनाबाबत महायुतीतील घटक पक्षांमध्ये चर्चा सुरू असून, येत्या १० ते १५ दिवसांत वाटपाचा निर्णय होईल. कोणत्या पक्षाच्या वाट्याला कोणते महामंडळ द्यायचे, हे निश्चित झाल्यानंतर अध्यक्षपदाबाबतही निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गटाचे) खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दिली. भंडारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांनी महामंडळांच्या वाटपाबाबत चर्चा केली असल्याचे पटेल यांनी सांगितले.

जिल्ह्यातील भंडारा-खापा-बालाघाट या राष्टÑीय महामार्गाच्या बांधकामासंदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व संबंधीत विभागाच्या अधिकाºयांशी बैठक पार पडली असुन लवकरच या कामांना सुरूवात होणार असल्याचे खा.पटेल यांनी सांगीतले.काही नेतेमंडळी फक्त सदनाच्या बाहरे फलक घेवुन स्टंटबाजी करतात त्यांनीसुध्दा क्षेत्रातील विकासाकरीता प्रयत्न करावे असा टोलासुध्दा खा.पटेल यांनी यावेळी लगावला. ‘वंदे मातरम’ हे राष्ट्रीय प्रतीक असून, स्वातंत्र्यलढ्यात सर्वांचाच सहभाग होता. स्वातंत्र्यानंतर लोकशाही प्रक्रियेतून सरकारे सत्तेवर आली. त्यामुळे ‘आम्हीच सारे केले’, असे म्हणणे काँग्रेसला चालणार नाही, अशी टीका प्रफुल्ल पटेल यांनी केली. ‘वंदे मातरम’ या गीतामध्ये आक्षेपार्ह असे काहीही नाही. रवींद्रनाथ टागोर यांनीही या गीताला मान्यता दिली होती. संसदेच्या कामकाजाची सुरुवातही या गीताने केली जाते. त्याला कायदेशीर मान्यताही मिळाली आहे. त्यामुळे काँग्रेसने ‘वंदे मातरम’ चा विषय आता येथेच थांबवावा, असा सल्ला खा.पटेल यांनी यावेळी दिला. यावेळी खासदार राजेंद्र जैन,आ.राजु कारेमोरे व धनंजय दलाल हेसुध्दा उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *