भंडारा पत्रिका / नागपूर : महाविकास आघाडीतील राजकीय घडामोडींवर भाष्य करताना कडू म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये स्पर्धा सुरू आहे; मात्र महायुतीमध्ये अशी स्पर्धा नाही. पुणे विधान परिषद निवडणुकीतील उमेदवारी मागे घेण्याच्या मुद्द्यावर विदर्भातील नेते भाष्य करणार नसल्याची भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.
सरकारकडून शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पाच हजार रुपयांच्या मदतीबाबत बोलताना ही रक्कम अपुरी असल्याचे कडू यांनी सांगितले. सध्या मिळणारी मदत हा पहिला टप्पा असून, दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना १० ते १५ हजार रुपयांपर्यंत अधिक मदत मिळावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अहिल्यादावी होळकर योजनेबाबत बोलताना गरीब शेतकऱ्यांना अधिक मदत मिळावी आणि पात्र शेतकरी योजनेच्या लाभापासून वंचित राहू नयेत तसेच आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांना योजनेतून वगळण्यात आले आहे. मात्र, एखाद्या पात्र शेतकऱ्याचे नाव चुकीने वगळले गेले असल्यास त्याची दखल घेऊन कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.