भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : जिल्हाधिकाºयांनी जिल्ह्यात बोगस वैद्यकीय व्यवसायाविरोधात तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिल्यानंतर साकोली तालुक्यात कथितरीत्या वैध वैद्यकीय पात्रता नसताना उपचार केल्या जात असल्याच्या तक्रारींमुळे तालुक्यातील आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तालुका आरोग्य विभागाच्या दुर्लक्षित कार्यपद्धतीमुळे आणि कथित संगनमतामुळे अशा बोगस डॉक्टरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची माहिती पुढे येत आहे. तालुका आरोग्य विभागाचा या कथित बोगस डॉक्टरांना आश्रय असल्याने कारवाई होत नसल्याची चचार्ही नागरिकांमध्ये आहे. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार तालुक्यात सुमारे १५० ते २०० कथित बोगस डॉक्टर कार्यरत असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या संख्येची कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही. ग्रामपंचायत स्तरावर सर्वेक्षण करून वस्तुस्थिती समोर आणण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी जिल्ह्यात अशा प्रकरणांमध्ये तातडीने कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. तालुक्यातील पिंडकेपार, एकोडी, गोंडउमरी, वीरशी, सातलवाडा, सानगडी, बोदरा, उमरी, परसोडी, मोखे, किन्ही तसेच साकोली-सेंदुरवाफा यासह तालुक्यातील मोठ्या गावांमध्ये कथितरीत्या अशा दवाखान्यांमधून उपचार सुरू असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. नागरिकांचा दावा आहे की, काही ठिकाणी परराज्यातील पदव्या, प्रमाणपत्रांच्या प्रती अथवा प्रशिक्षणाशी संबंधित कागदपत्रांच्या आधारे उपचार केले जातात. काही कथित दवाखान्यांमध्ये सामान्य आजारांपासून गंभीर आजारांवर उपचार करण्याचे दावेही केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, परजिल्ह्यांतील रुग्णही खासगी वाहनांनी या ठिकाणी उपचारासाठी येतात. कमी खर्चात उपचार मिळण्याची अपेक्षा आणि आजार बरा होईल या आशेने आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्ण अशा ठिकाणांचा आधार घेत असल्याचे सांगितले जाते.
वैध वैद्यकीय पात्रतेशिवाय उपचार केले जात असल्यास चुकीचे निदान, चुकीची औषधे किंवा उपचारास होणारा विलंब यामुळे रुग्णांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. प्रकरण केवळ उपचारांपुरते मर्यादित नसून कथित दवाखान्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ठेवण्यात येणाºया औषधांचा स्रोत, त्यांचा साठवणुकीचा प्रकार, औषधविक्रीसाठी आवश्यक परवाना, औषधांची वैधता तसेच प्रतिबंधित किंवा मुदतबाह्य औषधांचा वापर होत आहे का, याचीही तपासणी करण्याची मागणी होत आहे. तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि आरोग्यवर्धिनी केंद्रांमध्ये वेळेवर डॉक्टर-कर्मचाºयांची उपलब्धता, बाह्यरुग्ण विभागाचे कामकाज आणि औषधपुरवठ्याबाबतच्या तक्रारींचीहीसमीक्षा करण्याची मागणी होत आहे.
तालुका आरोग्य विभागाच्या दुर्लक्षित धोरणांमुळे ग्रामीण आरोग्य व्यवस्था अक्षरश: ह्यदेवाच्या भरवशावरह्ण असल्याचा आरोप ग्रामीण भागातील नागरिकांकडून केला जात असून, या परिस्थितीचीही चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकाºयांच्या निर्देशानुसार ग्रामपंचायतींकडून माहिती घेऊन संशयित प्रकरणांची तपासणी करणे आणि दोष सिद्ध झाल्यास कायदेशीर कारवाई करणे अपेक्षित आहे. आता साकोलीत प्रत्यक्ष तपासणी, वैद्यकीय पदवी व नोंदणीची पडताळणी तसेच औषधसाठ्याची तपासणी कधी आणि कितपत प्रभावीपणे केली जाते, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.