
भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : राज्य मंडळाने शुक्रवारी इयत्ता दहावीचा निकाल जाहीर केला आहे. निकाल हाती आल्याने विद्यार्थी व पालक आता अकरावी प्रवेशाची धडपड करणार आहेत. दुसरीकडे शिक्षण विभागानेही शैक्षणिक सत्र २०२६-२७ मधील इयत्ता अकरावी केंद्रीय आॅनलाइन प्रवेश प्रक्रियेला गती दिली असून, सोमवार (दि. ११) पासून https://mahafyjcadmissions.inया अधिकृत पोर्टलवर अजार्चा भाग-१ आणि भाग-२ भरून नोंदणी करता येणार आहे.
माध्यमिक विभागाचे शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी ही माहिती दिली. दरम्यान, विद्यार्थ्यांना प्रवेश अर्जाचा भाग-१ भरण्याची सुविधा महिनाभरापूर्वीच अर्थात दि. १० एप्रिल २०२६ पासून उपलब्ध करून दिली होती. यात आतापर्यंत एकूण ७ लाख ७४ हजार ९१८ विद्यार्थ्यांनी प्रवेश अजार्चा भाग-१ भरुन नोंदणी केलेली आहे. सोमवारपासून प्रवेश प्रक्रियेचा भाग-१ आणि भाग-२ भरुन प्रवेश नोंदणी करता येणार आहे. या प्रक्रियेमध्ये तीन नियमित फेºया होतील. चौथी फेरी ओपन टू आॅल असेल. मुलींकरिता विशेष पाचवी फेरी घेण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी सदर पोर्टलवर उपलब्ध माहिती व सूचनेनुसार आपल्या प्रवेशासाठी आॅनलाइन पध्दतीने नोंदणी करावी, असे आवाहनही केले आहे.