यशवंत थोटे / भंडारा पत्रिका मोहाडी : SDMA Academy, भंडारा प्रस्तुत ‘स्टायलिश आयकॉन आॅफ इंडिया २०२६ – फॅशन अँड टॅलेंट शो, सीझन-५’ हा भव्य फॅशन व टॅलेंट शो उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या रविवार दि.६ सप्टेंबर २०२६ ला विवाह सेलिब्रेशन भंडारा येथे संपन्न झाला. या कार्यक्रमात किड्स, टीन, मिस्टर, मिस आणि मिसेस अशा विविध गटांतील स्पर्धकांनी आपल्या फॅशन, व्यक्तिमत्त्व आणि कलागुणांचे शानदार सादरीकरण केले. या भव्य शोचे आयोजन आकाश मेघवानी,पवन ठाकरे आणि अनुप तुरसकर यांनी केले.कार्यक्रमाचे व्यवस्थापन स्टायलिश इव्हेंट्स अँड टीम आणि सेटिसफॅक्शन इव्हेंट यांच्या माध्यमातून करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नरेंद्र भोंडेकर, आशु गोंडाणे आणि अतुल बावनकर यांची उपस्थिती लाभली. तसेच विक्की ठाकूर यांच्या रॉयल किंग बाउन्सर टीमने कार्यक्रमासाठी विशेष सुरक्षा सहकार्य केले.या स्पर्धेत किड्स, टीन, मिस्टर, मिस आणि मिसेस अशा विविध गटांमध्ये स्पर्धकांनी आपल्या फॅशन, व्यक्तिमत्त्व व कलागुणांचे सादरीकरण केले. विशेष म्हणजे Kidzee Play School आणि Bachpan Play School मधील विद्यार्थ्यांनीही या शोमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या विद्यार्थ्यांनातसेच त्यांच्या पालकांना आणि शाळांना कार्यक्रमासाठी दिलेल्या सहकार्याबद्दल आयोजकांनी विशेष आभार व्यक्त केले. विविध गटातील विजेते किड्स गट : विजेती हिमांगी बोधे द्वितीय आयत शेख, तृतीय त्रिग्या रामटेके टीन गट : विजेती माही ठाकरे, द्वितीय प्रत्युषा निनावे, तृतीय ऋषिका पांचे, मिस्टर गट : विजेता गौरव गभणे, द्वितीय निशांत दमाहे, तृतीय पियुष राऊत, मिस गट:विजेती भूमी जाधव, द्वितीय वल्लारी आवळे, तृतीय नंदिनी पटले, मिसेस गट: विजेती कल्याणी मोरे, द्वितीय योगिता मेश्राम, तृतीय ज्योती रायपुरे, टॅलेंट राउंडमध्येही रंगला जल्लोष शोमधील टॅलेंट राउंड हे विशेष आकर्षण ठरले. किड्स :विजेती हिमांगी बोधे, उपविजेती योशिता ठवरे टीन:विजेती माही ठाकरे, उपविजेती कृतिका डेकाटे, मिस: विजेती सावली मेश्राम, उपविजेती भूमी जाधव, मिसेस :विजेती अश्लेषा रोडगे उपविजेती कोमल धकाते मिस्टर : विजेता पियुष राऊत उपविजेता अथर्व भुसे ज्युरी व मान्यवरांची उपस्थिती. स्पर्धेचे परीक्षण मिस अदिती मिश्रा, मिस वैशाली भगत,मिसेस प्रियंका टेंभुरकर आणि श्री. दक्ष शंभरकर यांनी केले.
शोच्या दिग्दर्शक म्हणून मिस साक्षी भेलावे यांनी जबाबदारी सांभाळली. शोचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून किड्स श्रेणीत निराली पडोळे, टीन श्रेणीत आलिया परवीन आणि मिसेस श्रेणीत सोमा दास यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी स्वामी नेवारे, दर्शन वाघमारे, मोहेंद्र रहांगडाले, निशी उईके,प्रिया कटकवार, वंशिता पंजवानी, निकिता चौधरी आणि दशीन बनसोड यांनी विशेष योगदान दिले. फॅशन व ग्लॅमरची खास रंगत कार्यक्रमाला Rieseling Studio यांचे मेकअप सपोर्ट लाभले. आउटफिट पार्टनर म्हणून बालाघाट रेंटल स्टुडिओ, जान्हवी क्रिएशन्स, अवनी फॅशन, महालक्ष्मी रेंटल स्टुडिओ आणि रुक्सार डिझाइन यांनी सहकार्य केले. फोटोग्राफीसाठी वैभव तित्तिरमारे, तबिश अहमद, भूषण कुमार, राकेश पवार आणि सार्थक चव्हाण यांनी विशेष योगदान दिले. शोमध्ये अन्वी डौलकर, श्रावणी गायधनी, प्रिया शहारे आणि कियारा खोब्रागडे यांनी शो ओपनर म्हणून, तर पोरस राठोर, नित्या तोमर, स्पृहा अवधूत, रुपाली मेहरा, रश्मी मानकर आणि श्रद्धा यांनी शोस्टॉपर म्हणून आपल्या शानदार सादरीकरणाने उपस्थितांची दाद मिळवली. स्वराली नाईक आणि काव्यांश कोल्हे यांनी विशेष कामगिरी करत कार्यक्रमात आपली वेगळी छाप पाडली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेबद्दल आयोजकांनी सर्व विजेते, उपविजेते, स्पर्धक, ज्युरी, पाहुणे, सहकारी, पालक आणि संपूर्ण टीमचे आभार मानले. फॅशनसोबतच मुलांमध्ये व तरुणांमध्ये आत्मविश्वास, व्यक्तिमत्त्व विकास आणि कलागुणांना व्यासपीठ देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.