अवैध रेती वाहतुकीचा टिप्पर पकडला

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा तहसील कार्यालयाचे महसूल पथक १० तारखेचे रात्री गस्तीवर अस्तांना त्यांना मिळालेले माहिती प्रमाणे मुंडीपार येथून अवैधरित्या रेती भरून टिपर जात असल्याचे माहिती वरून तिरोडा तहसीलदार एन.एम. ठाकरे यांचे मार्गदर्शनात मंडळ अधिकारी सुनील शहारे, ग्राम महसूल अधिकारी निशांत दमाहे, स्वप्नील कारभारी, सुजित डोंगरे ,पी .एस. चाफले. आनंद भूते यांचे पथकाने बेलाटी बुजरूक गावा जवळ जवळ सापळा रचला असता पहाटे दीड वाजता दरम्यान मुंडीपार कडून एम एच ४० डी.सी. ४६३० अर्धवट नंबर मिटवलेला टीपर येताना दिसल्या वरून सदर टिपर थांबवून चालकास रेती उत्खनन व वाहतुकीचे परवाना बाबत विचारले असता चालक हार्दिक गोविंदा शहारे रा. दवडीपार भंडारा याने आपल्याकडे रेती उत्खनन व वाहतुकीचा कुठलाही परवाना नसल्याचे सांगीतले. सदर टिप्पर विकेश कुंभरे व प्रमोदकुमार उके यांचा असल्याचे सांगून आपण सदर रेती अवधेरीत्या मुंडीपार येथून भरून आणल्याचे सांगितल्याने महसूल पथकाने सदर टिप्पर ताब्यात घेऊन पुढील कार्यवाही करिता प्रकरण उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठवले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *