आता नातेवाईकांना शेतजमीन हस्तांतरण नि:शुल्क

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी नागपूर : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महसूल खात्यात अनेक सकारात्मक बदल करून नागरिकांना दिलासा देण्याचा धडाका सुरू केला आहे. त्यांच्या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. आता त्यांनी नातेवाईकांना शेतजमिनीच्या वाटपाच्या संलेखांवरील शुल्कही रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णयघेतला. यापूर्वी कुटुंबातील सदस्यांमध्ये करण्यात येणाºया शेतजमिनीच्या वाटपाच्या संलेखांवर (बक्षीस पत्र) २०० रुपये शुल्क लागत होते. हा निर्णय २०१६ मध्ये घेण्यात आला होता. आता २०० रुपये शुल्काचा निर्णय रद्द करण्यात आला. त्यामुळे गरीब शेतकºयांना मोठा दिलासा मिळणार आहे. महसूलमंत्री बावनकुळे यांनी मागील आठवड्यात ग्रामीणभागातील शेती, शेतरस्ते, वहिवाट किंवा पाण्याचे प्रवाह अडवणाºया दंडेलीखोरांना चाप लावण्यासाठी अत्यंत कठोर आणि शेतकºयांना दिलासा देणारा निर्णय घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या पुढा काराने महसूल विभागाने मामलतदार न्यायालय कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. या नव्या नियमांनुसार प्रकरणातील सुनावणीसाठी नोटीस थेट ईमेलवर बजावली जाणार असून, तहसिलदारांचा (मामलतदार) आदेश न मानणाºया अतिक्रमणदारांविरुद्ध बाधित शेतकºयाला मोफत पोलिस संरक्षण देणे आता बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबतचे परिपत्रकही जारी करण्यात आले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *