
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्यातील माध्यमिक, उच्च माध्यमिक शिक्षकांच्या प्रलंबित समस्याचा आढावा घेण्यासाठी बुधवारी माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे कार्यालयात शिक्षक आमदार सुधाकर अडबाले व पदवीधर आमदार अभिजित वंजारी यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी आदर्श विद्यालय सिहोरा येथील शरेखा फरहीन ईसराईल खान यांचे अनुकंपा नियुक्तीचे प्रकरण ‘आॅन दि स्पॉट’ निकाली काढण्यात आले. कामात दिरंगाई करण्याºया लिपिकाची उचलबांगडी करण्यात आली. लोकप्रतिनिधींनी मागितलेली माहिती व निर्देशाचे कटाक्षाने पालन न करतात, कर्तव्यात कसूर, कामात दिरंगाई व कार्यालयात बाहेरील व्यक्तींचा वाढलेला हस्ताक्षेपाचे समर्थन करणाºया वेतन पथकातील वरिष्ठ लिपिक दिनेश काटेखाये यांच्या बदलीचा प्रस्ताव शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे पाठविण्याचे आमदारांनी निर्देश दिले. तसेच दप्तर दिरंगाई व कामचुकर कर्मचाºयांना खडेबोल सुनावले.
याशिवाय १३ एप्रिल नंतर रिक्त अतिरिक्त शिक्षकांची माहिती द्यावी, प्रलंबित शालार्थ आयडिया प्रकरणे डीडीकडे पाठवलेल्या प्रकरणांची माहिती द्यावी. १ कोटी ४६ लाख रुपयाचे वेतनेत्तर अनुदान एक महिन्यात शाळांच्या खात्यावर जमा करण्यात यावे. शाळा मंडळ मान्यता व मान्यता वर्धित प्रकरणाची माहिती. प्रलंबित वैद्यकीय देयके व २० अर्जित रजा देयके यांची माहिती, जिल्ह्यातील कॅन्सर ग्रस्त रुग्णांची देयके तातडीने निकाली काढण्याचे वेतन पथकाने मान्य केले. नानाजी जोशी विद्यालय शहापूर येथे कायम मुख्याध्यापक मान्यता देण्यात येईल.
३१ मार्च पूर्वी पाठविलेले सेवानिवृत्ती प्रकरणे, जीपीएफ नापरतावा, अंतिम परतावा प्रलंबित माहिती, शुक्राचार्य विद्यालय मिरेगाव शाळेची चौकशी करून अहवाल देण्यात येईल, बुटी शिक्षण संस्था खमारी यांचे न्यायालयीन आदेश तपासून प्रलंबित रोस्टर मान्य करण्यात येईल. प्रकाश हायस्कूल कारधा येथील शिपाई लहू कारीमोरे यांचे मूळ आस्थापनेतून कागदपत्रे देण्याची कार्यवाही करण्यात येईल, स्व. मार्तंडराव कापगते विद्यालय जांभळी सडक, साकोली, गजानन रंभाळ विद्यालय या शाळेतील संस्थेअंतर्गत अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनास मान्यता देणे, याकडे विशेष लक्ष देण्याची मागणी करण्यात आली. यावेळी आमदार सुधाकर अडबाले, अभिजित वंजारी, माध्यमिक शिक्षणाधिकारी मनिषा गजभिये, प्राथमिक शिक्षणाधिकारी रविंद्र सोनटक्के, सुधाकर देशमुख, राजेश धुर्वे, धीरज बांते, विलास खोब्रागडे, अनंत जायभाये, रुपेश नागलवाडे, दारासिंग चव्हाण, प्रभाकर मेश्राम इत्यादी उपस्थित होते.