भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- भूसंपादनाच्या वाढीव मोबदल्यावरून सुरू असलेल्या वादात गोंदियात न्यायालयाच्या आदेशानंतर चक्क उपविभागीय अधिकारी कार्यालयातील साहित्य आणि शासकीय वाहन जप्त करण्याची कारवाई करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकाºयांची खुचीर्ही जप्त करण्यात आल्याने या कारवाईची शहरात चर्चा रंगली आहे. गोंदिया शहरातील क्रीडा संकुल परिसरात राजू नागवंशी यांच्या मालकीची सुमारे ११ आर जमीन वर्ष २००९ मध्ये भूसंपादन प्रक्रियेत शासनाकडे गेली होती. मात्र, भूसंपादनानंतर मिळणाºया मोबदल्यात वाढ मिळत नसल्याने नागवंशी यांनी न्यायालयात धाव घेतली. या प्रकरणात दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयाने आदेश दिल्यानंतर उपविभागीय अधिकारी कार्यालयातील साहित्य आणि शासकीय वाहन जप्त करण्याची कारवाई चे आदेश देण्यात आले त्या नंतर आज ३ सप्टेंबरला तक्रारदार यांचे वकिलासह न्यायालयातील कर्मचारी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात येऊन कारवाईला सुरुवात केली.
या वेळी उपविभागीय अधिकारी यांच्या खुर्चीसह कार्यालयातील साहित्य व गाडीही जप्त करण्याचे आदेश होते मात्र उपविभागीय अधिकारी हे जिल्हाधिकार्यालयाला गेल्या असल्यामुळे इतर साहित्य जप्त करण्यात आले मात्र गाडी जप्त करण्यात आली नाही त्यामुळे गाडी जेव्हाही येणार तेव्हा जप्त करण्यात असल्याचे तक्रार च्या वकील आणि सांगितले आहे. तर गोंदिया शहरातील क्रीडा संकुल परिसरातील राजू नागवंशी यांच्या मालकीची सुमारे ११ आर जमीन वर्ष २००९ मध्ये भूसंपादन प्रक्रियेत घेण्यात आली होती. या जमिनीच्या मोबदल्याबाबत शासनाकडून रक्कम मिळाली असली, तरी वाढीव मोबदला मिळत नसल्याचा दावा नागवंशी यांनी केला. वाढीव मोबदल्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र, अपेक्षित कार्यवाही होत नसल्याने त्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. या प्रकरणाची सुनावणी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर यांच्या न्यायालयात झाली.
न्यायालयाच्या आदेशानंतर संबंधित रकमेच्या वसुलीसाठी उपविभागीय अधिकारी कार्यालयातील साहित्य जप्त करण्याचे आदेश देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानुसार आज तक्रारदार राजू नागवंशी यांच्या वकिलांच्या उपस्थितीत जप्तीची कारवाई करण्यात आली. यावेळी कार्यालयातील विविध साहित्य, उपविभागीय अधिकाºयांची खुर्ची तसेच शासकीय वाहन जप्त करण्यात आले. भूसंपादनाच्या मोबदल्यासाठी सुरू असलेल्या या न्यायालयीन लढ्यात थेट शासकीय कार्यालयातील साहित्य आणि वाहन जप्त करण्याची वेळ आल्याने गोंदियात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.