एटीएममध्ये रोकड भरण्यास आलेल्या व्हॅनचा अपघात

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी तिरोडा : तिरोडा-गोंदिया मार्गावरील साई कॉलनी परिसरात सचिन प्रोव्हिजनजवळ असलेल्या स्टेट बँकेच्या एटीएममध्ये रोख रक्कम भरण्यास आलेल्या व्हॅनचा अपघात झाला. व्हॅन चालकाला अचानक भोवळ आल्याने वाहनावरील नियंत्रण सुटले आणि मागे उभ्या असलेल्या दोन दुचाकींना जोरदार धडक बसली. या अपघातात नवीन कोºया पल्सर मोटरसायकलचा अक्षरश: चुराडा झाला असून दुसºया दुचाकीचेही मोठे नुकसान झाले. मिळालेल्या माहितीनुसार, स्टेट बँकेच्या एटीएममध्ये रोख रक्कम भरण्यासाठी सीएमएस कनेक्टिंग कॉमर्स कंपनीची व्हॅन क्रमांक एमएच ४३ बीपी ७५१० आली होती. चालक व्हॅन मागे घेत असताना अचानक त्याला भोवळ आली. त्यामुळे व्हॅन अनियंत्रित झाली. अनियंत्रित झालेली व्हॅन मागे उभी असलेल्या नवीन कोºया पल्सर मोटरसायकल क्रमांक एमएच ३५ एएच ५५९५ वर जोरदार आदळली. धडक इतकी जबरदस्त होती की व्हॅनचे मागील चाक थेट मोटरसायकलवर गेल्याने पल्सर मोटरसायकलचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला.तसेच शेजारी उभी असलेली शाईन मोटरसायकल क्रमांक एमएच ३५ बीई ०६८९ हिलाही व्हॅनची धडक बसल्याने तिचेही मोठे नुकसान झाले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *