ओबीसींचा स्वतंत्र कॉलम नसेल तर जनगणनेत सहभाग नाही

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : आगामी जनगणनेत इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाची अचूक लोकसंख्या व सामाजिक-आर्थिक स्थिती स्पष्ट होण्यासाठी ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम तसेच संगणकीय ‘ड्रॉप-डाऊन मेन्यू’ची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी जोरदार मागणी सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नसेल तर जनगणनेत ओबीसी समाजाचा सहभाग राहणार नाही, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.

या मागणीचे निवेदन १ सप्टेंबर २०२६ रोजी तहसीलदारांमार्फत माननीय राष्ट्रपती, पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, भारताचे महा निबंधक व जनगणना आयुक्त तसेच केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्री यांना पाठविण्यात आले. भारतात सामाजिक न्याय, आरक्षण, शिक्षण, रोजगार आणि सर्वसमावेशक विकासाच्या धोरणांची प्रभावी आखणी करण्यासाठी जातनिहाय अचूक आकडेवारी अत्यंत महत्त्वाची आहे. मात्र ओबीसींचीस्वतंत्र नोंद करण्यासाठी स्वतंत्र कॉलम न ठेवता ओपन-एंडेड पद्धतीने जात नोंदविण्याची प्रक्रिया राबविल्यास पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात विस्कळीत व अविश्वसनीय आकडेवारी निर्माण होण्याची शक्यता असल्याचे महामोचार्ने निवेदनात म्हटले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *