दिल्ली येथील जंंतर मंतरवर नीट परीक्षेच्या पेपरफुटीप्रकरणासोबतच आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्याकरीता काँकरोच जनता पार्टीच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या आंदोलनाला गोंदिया जिल्हावासियांनीही समर्थन देत सरकारच्या भूमिकेचा निषेध नोंदवला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित आंदोलनात आमरण उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांच्या उपोषण आणि विद्यार्थी आंदोलनांच्या समर्थनार्थ आज २० जुलै रोजी गोंदिया शहरासह जिल्ह्यातील विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी आणि नागरिकांनी पुढाकार घेत वांगचुक यांच्यावर लादण्यात आलेल्या दडपशाहीचा निषेध करत केंद्र सरकारविरोधात शांततापूर्ण मोर्चो काढत निदर्शने केली.
देशभरात गाजलेल्या परीक्षेसंदर्भातील कथित गैरव्यवहार, पेपर फुटी, आणि लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आल्याच्या मुद्द्यांवरून हे आंदोलन सुरू आहे. केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा, शिक्षण व्यवस्थेत पूर्ण पारदर्शकता, आणि दोषींवर कडक कारवाई या प्रमुख मागण्यांसाठी सोनम वांगचुक दिल्लीत उपोषणाला बसले होते. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न आणि लोकशाही मूल्यांचे रक्षण करण्यासाठी गोंदियासह विदर्भातील अनेक भागांतून तरुणांनी रस्त्यावर उतरून या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. विशेष म्हणजे सकाळपासूनच या आंदोलनस्थळी युवक युवतींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. ठएएळ