क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्नशील राहणार – खा. राजेंद्र जैन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी देवरी : आज अग्रसेन भवन, आमगाव रोड, देवरी येथे तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने खासदार राजेंद्र जैन यांचा सत्कार तसेच कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांच्या वतीने खासदार राजेंद्र जैन यांचे उत्स्फूर्त स्वागत करून त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. खासदार प्रफुल पटेलजी यांच्या माध्यमातून देवरी शहरातील वाहतुकीचा प्रश्न सोडविण्यासाठी उड्डाणपुलाचे काम सिंगल खांबावर करण्याबाबत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करण्यात येईल. तसेच शेतकरी हा विकासाचा केंद्रबिंदू असून धान उत्पादक शेतकºयांना बोनस मिळावा यासाठीही पाठपुरावा करू, अशी ग्वाही खासदार जैन यांनी दिली.

खासदार राजेंद्र जैन पुढे म्हणाले की, या क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासनाच्या माध्यमातून विविध विकासकामांना गती देण्यासाठी कटिबद्ध आहे. तसेच कार्यकर्त्यांनी शासनाच्या लोककल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचवाव्यात व पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन खासदार राजेंद्र जैन यांनी केले. यावेळी सर्वश्री नरेश माहेश्वरी, प्रेमकुमार रहांगडाले, सुरेश हर्षे, केतन तुरकर, रमेशभाऊ ताराम, गोपाल तिवारी, सि.के.बिसेन, पार्वताबाई चांदेवार, अर्चना ताराम, सुमन बीसेन, उषा तिवारी, प्रल्हाद भोयर, पंकज सहारे, भैय्यालाल चांदेवार, नेहमीचंद आंबीलकर, हिना टेंभरे, शर्मिलाताई टेंभुर्णे, सचिन अग्रवाल, भैय्यालाल पुस्तोडे, सुमित अग्रवाल, श्रेय जैन, मुकेश अग्रवाल, कैलास अग्रवाल, दिलीप दृगकर सहित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *