खांब तलाव चौकात शिवसेनेचे आंदोलन

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : स्थानिक खांब तलाव चौकातील रस्त्यांची झालेली दुरावस्था लक्ष्यात घेता आज शिवसेनाद्वारे आ. नरेंद्र भोंडेकर यांच्या नेतृत्वात रस्ता रोको आंदोलन करण्यात आला. नॅशनल हायवे विभागाच्या अंतर्गत असलेल्या या रस्त्याची पूर्ण दुरुस्ती एका आठवड्याच्या आत करण्याचा इशारा देत हे आंदोलन स्थगित करण्यात आले. सोबतच रस्ता दुरुस्त झाला नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आ. नरेंद्र भोंडेकर यांनी दिला. उल्लेखनीय आहे कि, राजीव गांधी चौक ते शास्त्री चौकाकडे जाणारा भंडारा शहरातील एक मुख्य मार्ग आहे. या मार्गावर खांब तलाव चौक असून या चौकाच्या जवळपास अर्ध्या किलोमीटर अंतराच्या रस्त्याची पूर्णपणे दुरवस्था झालेली आहे. अश्यात या ठिकाणी अपघात होणे रोजची बाब झाली आहे.

ही बाब आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पर्यंत येताच त्यांनी आज शिवसेनेतर्फे या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्याचा पावित्रा घेतला आणि आपल्याशिवसैनिकांसह खांब तलाव चौकात पोहोचले आणि रस्ता रोको आंदोलन सुरु केले, ज्यामुळे जवळपास २ तास या रस्त्याची वाहतूक खोळंबली होती. या ठिकाणी पोहोचताच नॅशनल हायवे विभागाचे अधिकारी यांना बोलाविण्यात आले आणि रस्त्याची वास्तविकता त्यांना दाखविण्यात आली. यावर अधिकाºयांनी रस्ते दुरुस्ती करिता १५ दिवसांचा वेळ मागितला परंतु या रस्त्यावर होत असलेले अपघात पाहता आमदार भोंडेकर यांनी सात दिवसांचा वेळ देत रस्ते दुरुस्त न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येईल असा इशारा दिला व आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात शिवसेना जिल्हा प्रमुख अनिल गायधने, लोकसभा संपर्क प्रमुख संजय कुंभलकर, उप जिल्हा प्रमुख विकास मदनकर, शहर प्रमुख नरेंद्र बुरडे, शहर प्रमुख रोषण काटेखाये, जिल्हा संघटक नितीन धकाते, विनय मोहन पाशिने, सतीश तुरकर, दिनेश गजभिये, नरेश झलके, माजी नगर सेवक बंटी मिश्रा, कैलाश तांडेकर, मनोज बोरकर, संतोष त्रिवेदी, विक्की रावलानी, अर्चना श्रीवास्तव सह अन्य शिवसैनिक सहभागी झाले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *