गुदमा-प्रतापबाग रेल्वे मार्गाविरोधात १२ गावांतील शेतकºयांचा आक्रोश

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- गुदमा ते प्रतापबागदरम्यान प्रस्तावित नव्या रेल्वे मागार्साठी सुरू असलेल्या भूसंपादनाच्या प्रक्रियेला गोंदिया तालुक्यातील १२ गावांतील शेतकरी आणि नागरिकांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. जमिनीच्या मोबदल्यासाठी प्रशासनाकडून पाठविण्यात आलेल्या नोटिसांमध्ये मिळणारा दर हा बाजारभावाच्या तुलनेत अत्यल्प असल्याचा आरोप करीत सोमवारी शेकडो शेतकºयांनी गोंदिया उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडकले. यावेळी शेतकºयांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकाºयांना सादर केले. गुदमा-प्रतापबाग रेल्वे लाईनच्या निर्मितीसाठी परिसरातील विविध गावांमध्ये जमीन संपादनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कटंगी कला, नागरा, हलबीटोला, सावरी यासह अन्य गावांतील शेतकरी, भूधारक, प्लॉटधारक, घर व दुकानमालक या प्रक्रियेमुळे बाधित होणार आहेत.

प्रशासनाकडून नुकसान भरपाईसंदर्भातील नोटिसा मिळाल्यानंतर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. कोट्यवधींच्या जमिनीला कवडीमोल मोबदला दिले जात आहे. ज्या जमिनीचे सध्याचे बाजारमूल्य मोठ्या प्रमाणात आहे, त्या जमिनीचे मूल्यांकन प्रशासनाकडून अत्यल्प दराने करण्यात आल्याचा आरोप शेतकºयांनी केला आहे. त्यामुळे शासनाने सध्याच्या बाजारभावाचा विचार करून जमिनीचा मोबदला किमान पाच पट वाढवून द्यावा, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. योग्य मोबदला मिळाल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत जमीन देणार नसल्याची भूमिका शेतकºयांनी घेतली आहे. याशिवाय बाधित भूधारकाच्या कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नोकरी देण्यात यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. रेल्वे मार्गासाठी एखाद्या शेतकºयाच्या जमिनीचा काही भाग संपादित झाल्यानंतर उर्वरित जमीन शेतीसाठी किंवा अन्य वापरासाठी निरुपयोगी होत असल्यास अशा संपूर्ण जमिनीची योग्य भरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकºयांनी केली आहे.

पांदण रस्ते बंद होण्याचीही चिंता प्रस्तावित रेल्वे मार्गामुळे अनेक गावांमधील पारंपरिक पांदण रस्ते बंद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकºयांना शेतात जाण्या-येण्यासाठी मोठ्या अडचणी निर्माण होणार आहेत. रेल्वे मार्गामुळे बंद होणाºया पांदण रस्त्यांना पर्यायी रस्त्यांची व्यवस्था प्रशा सनाने करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. दरम्यान, या मागण्यांसंदर्भात शेतकºयांनी उपविभागीय अधिकाºयांची भेट घेऊन निवेदन दिले. शासनाने शेतकºयांच्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून ३० आॅगस्टपर्यंत मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा ३१ आॅगस्ट रोजी गोंदियाबालाघाट मार्गावर रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा १२ गावांतील शेतकरी आणि नागरिकांनी दिला आहे. भूसंपादनाच्या मोबदल्या वरून शेतकरी आणि प्रशासनामध्ये निर्माण झालेला वाद आता आंदोलनाच्या दिशेने जात असल्याने प्रशासन यावर काय तोडगा काढते, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *