आरोग्य दारी, चिंता हरी! ‘श्री गणेश अभियान २.०’ अंतर्गत ६१५ शिबिराून ३० हजारहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी!
भंडारा पत्रिका / प्रतिनिधि
गोंदिया: महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आलेल्या ‘श्री गणेश आरोग्याचा अभियान २.०’ अंतर्गत गोंदिया जिल्ह्यात नागरिकांचा अतिशय उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या वतीने १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या १२ दिवसांच्या कालावधीत जिल्ह्यातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांच्या ठिकाणी विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
‘श्री गणेश आरोग्याचा अभियान २.०’ अंतर्गत ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या हक्काच्या आरोग्य सुविधा घरपोच आणि मोफत मिळण्यासाठी यासाठी विविध प्रतिबंधत्मक, निदानात्मक आणि उपचारात्मक सेवा पुरविण्यात आल्याची माहिती सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अरविंदकुमार वाघमारे यांनी दिली आहे.
गणेशोत्सवाच्या काळात आरोग्य सुविधा थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने ग्रामीण भागात एकूण ६१५ आरोग्य शिबिरे यशस्वीपणे राबविण्यात आली. या मोहिमेत तब्बल ३०,८५८ लाभार्थ्यांनी आपली मोफत आरोग्य तपासणी करून घेतली. यामध्ये १९,४९४ पुरुष, ११,०३३ स्त्रिया व १,५१० बालकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील महिलांनी या मोहिमेला सर्वाधिक प्रतिसाद दिल्याची माहिती डीएचओ डॉ. गोलहार यांनी दिली आहे.
या अभियानाबाबत माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत गोलहार यांनी सांगितले की, गणेशोत्सवाचे औचित्य साधून मंडळांच्या ठिकाणी आयोजित या शिबिरांमध्ये प्रामुख्याने संसर्गजन्य आजार जसे की जीवनशैलीशी निगडित गंभीर आजारांचे प्राथमिक टप्प्यात निदान करण्यासाठी शिबिरात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या रक्ताची मोफत तपासणी, मधुमेह संबंधाने रक्तातील साखरेचे प्रमाण तपासण्यासाठी मोफत ‘रॅपिड ब्लड शुगर’ चाचण्या, तंबाखू, गुटखा किंवा गुटखा सेवनामुळे तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका ओळखण्यासाठी तज्ज्ञांद्वारे तोंडाच्या कर्करोगांची तपासणी यावर विशेष भर देण्यात आला. ग्रामीण भागात पावसाळ्यानंतर उद्भवणाऱ्या संसर्गजन्य आजारांना रोखण्यासाठी विशेष तपासण्या करण्यात आल्या (मलेरिया), कुष्ठरोग आणि क्षयरोग (टीबी) यांसारख्या संसर्गजन्य आजारांचे निदान करण्यात आले.
उपचारात्मक व औषधोपचार सेवेत तपासणी दरम्यान आढळलेल्या आजारी रुग्णांना डॉक्टरांच्या सल्श्यानुसार जागेवरच आवश्यक त्या सर्व गोळ्या, औषधे आणि मलहम मोफत देण्यात आले. जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी आणि तज्ज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांना मोफत वैद्यकीय समुपदेशन. ज्या रुग्णांना पुढील मोठ्या उपचारांची किंवा शस्त्रक्रियेची गरज आहे, त्यांना मुख्यमंत्री सहायता निधी तसेच धर्मदाय रुग्णालयांच्या माध्यमातून मोफत उपचारांसाठी जिल्हा रुग्णालय किंवा मोठ्या वैद्यकीय महाविद्यालयांचे संदर्भत करण्यात आले.
प्रतिबंधनात्मक सेवा आणि जनआजागृती अंतर्गत व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम, कर्करोगाची प्राथमिक लक्षणे आणि सकस आहाराचे महत्त्व पटवून देणारे समुपदेशन व आरोग्य शिक्षण गणेश मंडळांमध्ये विविध आजारापासून संरक्षण याचे मार्गदर्शन करणारी माहिती पत्रके व भितीपत्रिका पत्रके वाटण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि आशा सेविका यांनी १२ दिवस गावातळीवर घेतलेल्या विशेष परिश्रमांमुळे गोंदिया जिल्ह्यातील हे अभियान अत्यंत यशस्वी ठरले असून ग्रामीण भागातील हजारो नागरिकांना याचा मोठा दिलासा मिळाला आहे. सदर अभियान यशस्वी करण्यासाठी तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांचे नियोजन तर कार्यक्षेत्रातील समुदाय आरोग्य अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका व आशा सेविका यांचे प्रत्यक्ष कार्य मोलाचे ठरले.