गोबरवाही पोलिसांची अवैध मोहफूल साठवणुकीवर कारवाई

२.०७ लाखांचा मुद्देमाल जप्त

 

भंडारा पत्रिका/वार्ताहर

गरा-बघेड़ा : गोबरवाही पोलिसांनी अवैधरीत्या मोहफुलाचा सडवा साठवून ठेवल्याप्रकरणी कारवाई करत एकूण २ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई पाथरी येथील शेतशिवारातील नाल्याच्या काठावर करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अतुल विनोद राऊत (वय २५, रा. पाथरी, ता. तुमसर) हा अवैधरीत्या मोहफुलाचा सडवा साठवून ठेवल्याची माहिती गोबरवाही पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस हवालदार कडक यांनी पथकासह छापा टाकला. यावेळी पाथरी शेतशिवारातील नाल्याच्या काठावर प्लास्टिकच्या चुंगळ्यांमध्ये पॉलिथिनमध्ये भरून ठेवलेला एकूण ६८० किलो सडवा मोहफुलाचा साठा आढळून आला. जप्त केलेल्या मोहफुलाच्या सडव्याची किंमत प्रतिकिलो ३०० रुपये, अशी एकूण २ लाख ४ हजार रुपये आहे. तसेच घटनास्थळावरून ३ क्विंटल जळऊ लाकूड, किंमत ३ हजार रुपये, असा एकूण २ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

या प्रकरणी गोबरवाही पोलीस ठाण्यात अप. क्र. ४७२/२०२६, कलम ६५(फ) महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गोबरवाही पोलीस ठाण्याचे अधिकारी करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि स.पो.नि. अभिजीत पाटील यांच्या मार्ग

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *