ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे एकाच दिवशी २३ शस्त्रक्रिया यशस्वी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

लाखांदूर : शासनाच्या ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ आणि ‘सेवा संकल्प अभियान २०२६’ अंतर्गत ग्रामीण रुग्णालय, लाखांदूर येथे आज दिनांक ८ ऑक्टोबर २०२६ रोजी विशेष आरोग्य मोहिमेचे आयोजन करण्यात आले. या मोहिमेत विविध आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांवर एकूण २३ शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्या.

या विशेष मोहिमेदरम्यान हायड्रोसील (Hydrocele), हर्निया (Hernia), अपेंडिक्स (Appendix), शरीरावरील इतर गाठी, स्तनांतील गाठी तसेच कुटुंब नियोजन यांसारख्या महत्त्वाच्या शस्त्रक्रियांचा समावेश होता.

ही संपूर्ण मोहीम भंडारा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संदीप कुमार गर्धिये यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली तसेच ग्रामीण रुग्णालय लाखांदूरचे शल्यचिकित्सक तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय ठाकरे यांच्या अविरत प्रयत्नातून व दूरदृष्टीपूर्ण नियोजनामधून यशस्वी झाली. शस्त्रक्रिया यशस्वी करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने अहोरात्र परिश्रम घेतले.

यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्तात्रय ठाकरे, डॉ. शेखर नाईक, बधि-रकिरण तज्ज्ञ डॉक्टर सुमित मेश्राम, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. रोशनी राऊत -ठाकरे ) तसेच या मोहिमेत ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथील सर्व अधिपचारिकिका (Nursing Staff), कक्ष सेवक आणि इतर सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

चार आठवड्यात एकूण ५८ शस्त्रक्रिया पार पडले. सर्व रुग्णांची प्रकृती सध्या उत्तम व स्थिर असून त्यांच्यावर पुढील आवश्यक उपचार व देखरेख सुरू आहे. ग्रामीण भागातील गरजू रुग्णांना एकाच छाताखाली मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *