जिजामाता प्राथमिक शाळेत ‘प्रवेशोत्सव’ मोठ्या उत्साहात; नवीन शैक्षणिक सत्राला दिमाखात सुरुवात

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तुमसर : स्थानिक जिल्हा परिषद जिजामाता प्राथमिक शाळा, तुमसर येथे ३० जून २०२६ मंगळवार रोजी नवीन शैक्षणिक सत्राची सुरुवात अत्यंत उत्साहात आणि आनंदमयी वातावरणात करण्यात आली. पहिल्याच दिवशी शाळेत दाखल होणाºया पहिलीच्या चिमुकल्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रवेशोत्सव मेळावा’ आयोजित करण्यात आला होता. नव्याने प्रवेश घेणाºया सर्व विद्यार्थ्यांचे त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत कुमकुम टिळक लावून आणि पुष्पगुच्छ देऊन मोठ्या थाटात स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळालेल्या या आपुलकीच्या स्वागतामुळे चिमुकल्यांच्या चेहºयावरचा आनंद ओसंडून वाहत होता.

नवीन सत्राच्या पहिल्याच दिवशी शासनाच्या योजनेअंतर्गत उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, शालेय गणवेश आणि इतर शालोपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच, पहिल्या दिवसाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी माध्यान्ह भोजन (पोषण आहार) योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना विशेष गोड जेवण देण्यात आले. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक संतोषकुमार बोपचे आणि शिक्षिका ज्योती सहादेव नागलवाडे प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करत त्यांना पुढील शैक्षणिक प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. या सोहळ्याला विद्यार्थ्यांचे पालक आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकूणच जिजामाता प्राथमिक शाळेत नवीन सत्राची सुरुवात अतिशय सकारात्मक आणि उत्साही वातावरणात झाली.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *