जिल्हाधिकाºयांनी केली शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाची पाहणी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी आज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, भंडारा येथे भेट देऊन रुग्णालयातील विविध विभागांची पाहणी केली. यावेळी त्यांनी रुग्णालयातील आरोग्य सेवा, बाह्यरुग्ण विभाग (डढऊ), रुग्णांसाठी उपलब्ध सुविधा तसेच रुग्णालयातील व्यवस्थेचा आढावा घेतला. रुग्णालयातील उपचार घेत असलेल्या रुग्णांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांना मिळणाºया आरोग्यसेवा, उपचारांची गुणवत्ता, औषधोपचार तसेच रुग्णालयातील सुविधांबाबत माहिती जाणून घेतली असून रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (डढऊ) होणारी रुग्णांची गर्दी नियंत्रित करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाºयांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या. रुग्णांना उपचारासाठी अनावश्यक प्रतीक्षा करावी लागू नये, यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने सेवा देण्यावर भर देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

या रुग्णालयात उपचारासाठी येणाºया प्रत्येक रुग्णाशी आपुलकीने, संवेदनशीलतेने व सन्मानपूर्वक संवाद साधावा, तसेच रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना आवश्यक माहिती वेळेत उपलब्ध करून द्यावी, असेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले. आरोग्य सेवा ही केवळ उपचारापुरती मर्यादित नसून रुग्णांमध्ये विश्वास निर्माण करणे आणि त्यांना समाधानकारक सेवा देणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी जिल्हाधिकाºयांनी रुग्णालयातील अग्निसुरक्षा व्यवस्थेचाही आढावा घेतला. अग्निसुरक्षा लेखापरीक्षण नियमितपणे करून त्यातील त्रुटींची तातडीने पूर्तता करावी तसेच आपत्कालीन परिस्थितीत रुग्ण, नातेवाईक व कर्मचाºयांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबवाव्यात तसेच रुग्णालयातील सेवा अधिक गतिमान, सुलभ आणि रुग्णाभिमुख करण्यासाठी सर्वांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या पाहणीदरम्यान डॉ सुजाता दुधगावकर अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय भंडारा, डॉ संदिपकुमार गजभिये जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. अतुलकुमार टेंभुर्णे अति. जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सचिन चव्हाण अति. जिल्हा आरोग्य अधिकारी, अनिल बनकर जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, डॉ अजिंक्य आंबाडकर जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *