जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना १२ तास सुरळीत वीजपुरवठा करा

मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री यांच्याकडे आ. विजयकुमार रहंगडाले यांची मागणी

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी

तिरोडा : गोंदिया जिल्हा हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जात असून जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे प्रमुख साधन धान शेती आहे. सध्या धान पिकाच्या वाढीच्या व संगोनीपूर्वीच्या महत्त्वपूर्ण कालावधीत पिकाला आवश्यक पाणी मिळणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र कृषी पंपांसाठी उपलब्ध होणारा वीजपुरवठा अपुरा व वेळेच्या दृष्टीने अनियमित असल्याने शेतकऱ्यांना सिंचन करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजय रहंगडाले यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दररोज १२ तास सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याबाबत आदेश देण्याची मागणी केली आहे.

आमदार रहंगडाले यांनी पत्रात नमूद केले आहे की, गोंदिया जिल्हा धान उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जात असून जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांची उपजीविका धान शेतीवर अवलंबून आहे. सध्या धान पिकाच्या वाढीच्या व संगोनीच्या महत्त्वपूर्ण कालावधीत कृषी पंपांसाठी पुरेसा व नियमित वीजपुरवठा उपलब्ध होणे आवश्यक आहे.

अनियमित वीजपुरवठ्यामुळे सिंचनात अडचणी

कृषी पंपांसाठी उपलब्ध होणारा वीजपुरवठा अपुऱ्या प्रमाणात तसेच वेळेच्या दृष्टीने अनियमित होत असल्यामुळे शेतकऱ्यांना सिंचन करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. धान पिकाला आवश्यक त्या वेळे्ये पाणी उपलब्ध न झाल्यास त्याचा थेट परिणाम पिकांच्या उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नावरही विपरीत परिणाम होऊ शकतो. धान पिकासाठी सध्याचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असल्याने सिंचनाची निकड लक्षात घेऊन वीजपुरवठ्याचे नियोजन करणे आवश्यक असल्याचे आमदार विजय रहंगडाले यांनी पत्रातून निदर्शनास आणून दिले आहे.

दररोज १२ तास वीजपुरवठ्याची मागणी

शेतकऱ्यांच्या हिताचा तसेच धान पिकांच्या सिंचनाचा प्रश्न लक्षात घेऊन गोंदिया जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना दररोज १२ तास सुरळीत वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी आमदार विजय रहंगडाले यांनी मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

याबाबत संबंधित यंत्रणेला आवश्यक आदेश देऊन धान उत्पादक शेतकऱ्यांना सिंचनासाठी नियमित व पुरेशा वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती त्यांनी पत्राद्वारे केली आहे

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *