भंडारा प्रतिनिधी भंडारा : जिल्ह्याच्या दौºयावर असताना शासकीय विश्रामगृह, भंडारा येथे राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदय सावंत यांनी खासदार प्रफुल पटेल यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी जिल्ह्याच्या विकासाशी संबंधित विविध महत्त्वपूर्ण मुद्द्यांवर चर्चा करून औद्योगिक विकास व विकासकामांना गती, जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सहकार्य आणि प्रलंबित विकासकामांना गती मिळावी, याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. यावेळी खासदार राजेंद्र जैन, आमदार नरेंद्र भोंडेकर, आमदार राजूभाऊ कारेमोरे, शिवसेना नेते किरण पांडव, नानाभाऊ पंचबुद्धे, धनंजय दलाल यांच्यासह जिल्ह्यातील राष्टÑवादी काँगेस (अजीत पवार गट) व शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.