भंडारा पत्रिका/प्रतिनिधी तिरोडा : तिरोडाकडून कवलेवाडा कडे जाणारा मार्ग रेल्वे क्रॉसिंग पासून पंचशील झेंडा चौकापर्यंत खड्डेमय होऊन काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचत असल्याने या मागार्ने ये जा करणारे विद्यार्थी शेतकरी किंवा नागरिकांना जीव मुखीत घेऊन प्रवास करावा लागत असून केव्हाही गंभीर अपघात होण्याची शक्यता असली तरी प्रशासना कडून रस्ता दुरुस्ती करिता कुठलीही व्यवस्था करण्यात न आल्याने नागरिक संताप व्यक्त करीत आहेत.
तिरोडा कवलेवाडा मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग कडून रेल्वे क्रॉसिंग ते पंचशील झेंडा चौक पर्यंत जाणारा मार्ग पावसामुळे खड्डेमय झाला असून पाऊस येताच संपूर्ण खड्ड्यात पाणी साचून काही ठिकाणी गुडघाभर पाणी साचत असून याच मार्गाने पशुसंवर्धन कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, बाल विकास प्रकल्प, पंचायत समिती, तहसील कार्यालय ,भूमी अभिलेख कार्यालय व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यालय असल्याने तसेच याच मार्गावरून मोठ्या प्रमाणात कवले वाढा व इतर ग्रामीण क्षेत्रातून तिरोडा शाळा महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात सायकल दुचाकी व इतर वाहनाने विद्यार्थ्यांची येजा असून असून या मार्गावरून सतत दुचाकी चार चाकी वाहना सह स्कूल बस व इतरही लहान मोठ्या वाहनाची मोठ्या प्रमाणात वाहतूक असून रेल्वे क्रॉसिंग असल्यामुळे रेल्वे गेट बंद झाल्यास ताटकळत उभे राहावे लागू नये म्हणून वाहन चालक जोरात वाहने चालवत असून काही वेळा बंद रेल्वे गेट उघडताच मोठ्या प्रमाणात भरधाव वेगात वाहने धावत असून खड्डे व मोठ्या प्रमाणात खड्ड्यात साचलेल्या पाण्यात एखाद दुसरे वाहन पडून दुसरे वाहनामुळे येथे मोठा अपघात होण्याची शक्यता असली तरी याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याने कुठलीही दुरुस्ती वा पाणी निघून जाण्याची व्यवस्था झाली नसल्याने या मार्गाने ये जा करणारे वाहन चालक व नागरीक संताप व्यक्त करीत असून याबाबत तिरोडा तहसीलदार एन.एम. ठाकरे यांना विचारणा केली असता त्यांनी आपण रेल्वे विभागाचे अधिकाºयांची संपर्क साधून त्वरित रस्ता दुरुस्ती करून पाणी निघून जाण्याकरता व्यवस्था करू असे सांगितले आहे.