धान खरेदी संस्थांच्या अडचणींवर मंत्रालयात बैठक

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी साकोली : धान खरेदी संस्थांच्या विविध अडचणी व प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंगळवार, ६ आॅक्टोबर रोजी मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावर अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीस खासदार प्रफुल पटेल, पूर्व विदभार्तील सर्व संबंधित आमदार, विविध जिल्ह्यांतील धान खरेदी संघाचे अध्यक्ष, मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष रोहित निकम यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. यावेळी धान खरेदी संस्थांना भेडसावणाºया विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीत घट, हमाली, कमिशन, गोदाम भाडे यासह धान खरेदी प्रक्रियेशी संबंधित विविध प्रलंबित मागण्या प्रतिनिधींनी मांडल्या.

सर्व जिल्ह्यांच्या प्रतिनिधींना आपापल्या समस्या मांडण्याची संधी देण्यात आली. मंत्री छगन भुजबळ यांनी प्रत्येक जिल्ह्याच्या अडचणी जाणून घेत संबंधित मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतली. धान खरेदी संस्थांना आवश्यक त्या बाबींना मंजुरी देऊन प्रलंबित प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी भंडारा जिल्हा धान खरेदी संघाचे अध्यक्ष डॉ. नेपाल रंगारी यांनी जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र चालविणाºया संस्थांच्या विविध अडचणी मंत्री भुजबळ यांच्या निदर्शनास आणून दिल्या. केंद्रांच्या कामकाजात येणाºया अडथळ्यांसह प्रलंबित प्रश्नांवर त्यांनी सविस्तर माहिती दिली. या समस्या गांभीर्याने ऐकून घेत मंत्री भुजबळ यांनी संबंधित प्रश्न तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे आगामी धान खरेदी हंगामात संस्थांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *