नीट आंदोलनातील कथित गैरवर्तनाविरोधात भाजपाची जिल्हाधिकाºयांकडे तक्रार

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : नीट परीक्षेच्या कथित पेपरफ- ुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान काही आंदोलनकर्त्यांकडून गैरवर्तन होत असल्याचा आरोप करत भारतीय जनता पक्ष, तालुका भंडारा यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन सादर करून संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. निवेदनानुसार लोकशाही व्यवस्थेत प्रत्येक नागरिकाला शांततापूर्ण आंदोलन करण्याचा अधिकार आहे. मात्र, आंदोलनाच्या नावाखाली कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल अशा घटना घडू नयेत. काही आंदोलन कर्त्यांकडून देशाच्या पंतप्रधानांविषयी आक्षेपार्ह भाषा वापरणे, पोलीस अधिकारी व कर्मचाºयांशी गैरवर्तन करणे, मारहाणीचे प्रकार करणे, देशविरोधी घोषणा देणे, विविध धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारी वक्तव्ये करणे तसेच शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचे आरोप निवेदनात करण्यात आले आहेत.

या कथित प्रकारांची सखोल चौकशी करून दोषी आढळणाºयांविरुद्ध कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी भाजपने प्रशासनाकडे केली आहे. अशा घटनांमुळे समाजात असंतोष निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यासोबतच, प्रशासनाने या मागण्यांकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास भारतीय जनता पक्ष, तालुका भंडारा यांच्या वतीने जिल्ह्यात तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे. निवेदन देतांना भाजपचे जि.प. गटनेते विनोद बांते,भंडारा .पं.स. सभापती कल्पनाताई कुर्झेकर, भाजप तालुका अध्यक्ष विजय लिचडे,माजी उपसभापती पं.स.वर्षाताई साकोरे, पं.स.सदस्य प्रशांत खोब्रागडे,भाजप तालुका महामंत्री कल्याणी मते,माजी जि.प.सदस्य निलकंट कायते,शक्ती प्रमुख चंद्रशेखर पालांदुरकर,तालुका महामंत्री संजु मते,जि.प.प्रमुख सोपान बांते,गोवर्धन साकुरे,राजेश वाघमारे आदि उपस्थित होते.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *