पवनी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहिर

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी पवनी : भंडारा जिल्हाधिकारी यांचे अधिसुचनेनुसार पवनी तालुक्याकरिता सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्यात आले असुन तालुक्यातील एकुण ७९ ग्रामपंचायती पैकी, २३ ग्रामपंचायतीचे आरक्षण रळ व रउ प्रवर्गासाठी राखीव करण्यात आलेले आरक्षण कायम ठेवून उर्वरित ५६ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण नागरीकांचा मागास प्रवर्ग व खुल्या प्रवर्गासाठी, तसेच या प्रवर्गातील महिलासाठी पुढील सन २०२५ ते २०३० या कालावधीत मुदत संपणाºया ग्रामपंचायती करीता पाच वर्षाकरीता आरक्षित करण्यात आले आहे. तालुक्यातील परसोडी, ईटगांव, बाम्हणी, धामणी, खैरी दिवाण, सोनेगांव, गोसे/बुज, रळ नवेगांव/पाले, भुयार, सौंदड, वाही, तिर्री, उमरी, अड्याळ, पाहुणगांव, खापरी (रे.), सेंद्री (बु.), चिखली, कोंढा, मिन्सी, कातुर्ली, पौना (बुज), शिवनाळा, या २३ ग्रामपंचायतीची रळ व रउ प्रवर्गासाठी आरक्षित झाले.

उर्वरित ५६ ग्रामपंचायतीमधून १६ ग्रामपंचायती नागरीकांचा मागास प्रवर्ग करीता आरक्षित करण्यात आले. चिचखेडा पुर्न. (स्त्री), मेंढा पुर्न. (स्त्री), निलज (स्त्री), पालोरा चौ (स्त्री), वासेळा, धानोरी, सोमनाळा बुज., कलेवाडा, भावड, कोरंभी, आकोट (स्त्री), सिंदपूरी (स्त्री), कोदुर्ली (स्त्री), बाचेवाडी (स्त्री), नेरला, विरली खंदार, ४० ग्रामपंचायती सर्वसाधारण करीता आरक्षित करण्यात आले. फनोली, चकारा, सिरसाळा, ब्रम्ही, मांगली, कन्हाळगांव, गुडेगांव, निष्ठी, पौना खुर्द, निघवी, बोरगांव, मालची, कोसरा, भेंडारा, मोहरी, खातखेडा, चिचाळ, रनाळा, मोखारा, कुर्झा या २० ग्रामपंचायती सर्वसाधारण स्त्रीयाकरीता राखील करण्यात आले. रुयाळ, पिलांद्री, मेंढेगांव, पिंपळगांव, जुनोना, खांबाडी, केसलवाडा, बेटाळा, शेळी-सोमनाळा, भोजापूर, गोसे खुर्द, काकेपार, वलनी, उमरी चौ., आमगांव, शेंद्री खुर्द, आसगांव, सावरला या २० ग्रामपंचायती सर्वसाधारण करीता राखीव करण्यात आले. सदर आरक्षण तहसील कार्यालय पवनी येथील तहसीलदार पवनी सतीश साळवे तसेच निवडणूक नायब तहसीलदार श्रीमती शुभदा धुर्वे, कार्यालयातील कर्मचारी व विविध ग्रामपंचायती मधील पदाधिकारी व नागरिक यांचे उपस्थितीमध्ये काढण्यात आले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *