भंडारा पत्रिका / प्रतिनिधी लाखनी :- यंदा रोहिणी व मृग नक्षत्र कोरडेच गेले आद्रा नक्षत्राच्या च्या शेवटी मान्सूनने तालुक्यात हजेरी लावली हलक्या स्वरूपाच्या पावसाने बळीराजा सुखावला होता त्यामुळे शेतकºयांनी खरीप हंगामाच्या धानाच्या धान पिकाची पेरणी केली मात्र गेल्या पाच – सहा दिवसापासून पाऊस न आल्याने शेतातील उगवलेले धानाचे परे करपण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे शेतकरी चिंतेत असल्याचे दृश्य तालुक्यात दिसून येत आहे. रोहिणी नक्षत्र मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होतो तेव्हापासून मान्सूनाला सुरुवात होते मृग नक्षत्र कोरडाच गेला तर आद्रा नक्षत्र जाता जाता शेवटच्या क्षणी मान्सूनाने तालुक्यात हजेरी लावली मान्सून आल्यामुळे शेतकºयांनी हंगामाच्या कामाला सुरुवात केली.
आद्रा नक्षत्रात शेवटच्या क्षणी दोन-तीन दिवस पाऊस झाला त्यामुळे शेतकºयांच्या आशा पल्लवीत होऊन त्यांनी पेरण्या केल्या दरम्यान पावसाने पुन्हा दांडी मारली असून सध्या ऊन पडू लागले आहे त्यामुळे पेरलेल्या धनाची परे करपण्याच्या मार्गावर आहेत त्यामुळे बºयाच शेतकºयांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता नाकारता येत नाही अशी परिस्थिती संपूर्ण तालुक्यातील गावांमध्ये असल्यानेदुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
आधीच मान्सूनचे उशिरा आगमन झाले ट्रॅक्टर तथा बैल जोडीने शेतकरी बांधवांनी पेरणी केली आणखी काही दिवस पडला नाही तर शेतात पिकलेले धान पिकाचे वाटोळे झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही याच चिंतेत शेतकरी असून यंदा तरी चांगले उत्पादन होईल या आशेवर जगत असताना अचानक पावसाने दांडी मारल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. ज्यांच्याकडे सिंचनाची सोय आहे अश्या शेतकºयांची रोवणी आटोपण्याच्या मार्गावर आहे. तर जवळपास ९० ते ९५ टक्के शेतकरी पावसाच्या पाण्याची प्रतीक्षा करीत आहेत. तर काही शेतकरी शेतकरी मिळेल त्या साधनाचा उपयोग करून रोवणी करण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. पावसाने अशीच हुलकावणी दिल्यास जमिनीतील पाण्याचा उपसा झाल्याने पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.
त्यामुळे प्रशासनाने जिल्ह्यात पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही याकडे लक्ष देण्याची गरज आहे. १९७२ मध्ये अशीच परिस्थिती निर्माण झाली होती असे वृद्ध सांगत आहेत. त्यावेळी अन्न धान्याचा तुडवडा निर्माण झाल्याने परदेशातून अन्न आयात करावे लागले होते. अशी वेळ यावर्षी येवू नये अशी परमेश्वर चरणी विनंती असली तरी पिण्याचा पाण्याचा प्रश्न मात्र गंभीर होणार एवढे मात्र निश्चित आहे.