पीएम श्री लालबहादूर शास्त्री विद्यालयात प्रवेशोत्सव, स्वागत समारंभ व मोफत गणवेश-पाठ्यपुस्तके वितरण

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : दि. ३० जून पीएम श्री लालबहादूर शास्त्री विद्यालय, भंडारा येथे नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी प्रवेशोत्सव, नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ तसेच विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तके वितरण कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकारी श्री. सावन कुमार (कअर) यांच्या हस्ते करण्यात आले. त्यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना मोफत गणवेश व पाठ्यपुस्तकांचे वितरण करण्यात आले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत नियमित अभ्यास, शिस्त, गुणवत्तापूर्ण शिक्षण व उज्ज्वल भविष्यासाठी परिश्रम करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य तथा उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) राहुल बावा होते.

कार्यक्रमास शिक्षणाधिकारी (योजना) रवींद्र सोनटक्के, शाळा समिती सदस्य तथा माजी उपशिक्षणाधिकारी गोवर्धन भोंगाडे, शाळा समिती सदस्य धनंजय बिरणवार, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा मायाताई मेश्राम, सदस्या मंदाताई चंद्रिकापुरे, प्रियाताई लांजेवार, नितेश शनवारे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. शिक्षक प्रतिनिधी एस. आर. खिलोटे सर यांनी प्रास्ताविक सादर केले. कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी इयत्ता दहावीच्या वर्गाला भेट देऊन विद्यार्थ्यांशी हितगुज साधले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीची विचारपूस करताना विद्यालयाच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या योजनांना प्रशासनामार्फत शक्य ते सर्व सहकार्य व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले. कार्यक्रमाच्या वेळी अनेक पालकांची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोंदासे मॅडम यांनी केले. पाहुण्यांचे आभार बांते मॅडम यांनी मानून कार्यक्रमाची सांगता केली. सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विद्यालयातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *