
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : उपविभागीय अधिकाºयांनी बेकायदेशीरपणे वाळू वाहतूक करणाºया ट्रकवर कारवाई केली आणि वाहन पोलीस मुख्यालयात जमा केले. मात्र, गुन्हेगारांनी संधी साधून पोलीस मुख्यालयात उभा असलेला वाळूने भरलेला ट्रक चोरून नेला. या घटनेनंतर, कारधाचे पटवारी विठ्ठल मुंढे (३५) यांच्या तक्रारीवरून भंडारा पोलिस ठाण्यात अज्ञात गुन्हेगारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
२६ डिसेंबर २०२५ रोजी उपविभागीय अधिकारी माधुरी तिखे यांनी बेकायदेशीरपणे वाळू वाहतूक करणारा एमएच ४० बीजी ४७९८ क्रमांकाचा ट्रक जप्त केला. त्यानंतर हा ट्रक चोरट्यांनी चोरला. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार संदीप माकोडे यांच्या आदेशानुसार पटवारी विठ्ठल मुंढे यांनी भंडारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत. चोरट्यांनी चक्क पोलीस मुख्यालयातून ट्रक चोरी करण्याचा प्रयत्न केला. पोलीस मुख्यालयातील जर ट्रक चोरी जात असतील तर पोलीस प्रशासनाच्या दक्षतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले.
पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
भंडारा पोलीस मुख्यालयात जप्त करून ठेवलेला वाळूने भरलेला ट्रक चोरट्यांनी धाडसाने पळवून नेल्यामुळे पोलीस प्रशासनाच्या सुरक्षेवर आणि कार्यक्षमतेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.