
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी मुंबई : ‘स्वर स्वामी कला साधना’ प्रस्तुत “खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो” हा हिंदी व मराठी गीतांचा बहारदार कार्यक्रम शनिवार दिनांक २७ जून २०२६ रोजी सायंकाळी ५.०० वाजता सायन येथील सरस्वती आॅडिटोरियम, गोकुळ हॉल येथे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि जल्लोषात संपन्न झाला. प्रख्यात गायिका आशा भोसले व प्रख्यात भारतीय संगीतकार आर डी बर्मन यांना स्वर स्वामी कला साधना ग्रुप तर्फे स्वरमयी मानवंदना देण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजक श्री. गणेश हातगे सर, सौ. प्रियंका हातगे मॅडम, श्री. राजेश हुन्नरी सर आणि कु. सौरव हातगे यांनी कार्यक्रमाचे नियोजन अतिशय शिस्तबद्ध आणि उत्कृष्ट पद्धतीने केले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे संपूर्ण कार्यक्रम सुरळीतपणे पार पडला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तन्वी मॅडम यांनी आपल्या सुमधुर आवाजात, आकर्षक शेरो-शायरी आणि प्रभावी निवेदन शैलीत केले. त्यांच्या ओघवत्या सूत्रसंचालनामुळे रसिक प्रेक्षक कार्यक्रमाच्या शेवटपर्यंत खिळून राहिले. कार्यक्रमातील प्रत्येक गायक आणि गायिकेने आपल्या सुरेल आवाजात हिंदी व मराठी गाण्यांचे अप्रतिम सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. प्रत्येक गाण्यानंतर रसिक प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करून कलाकारांना भरभरून दाद दिली आणि प्रोत्साहन दिले. ध्वनिक्षेपणाची जबाबदारी सांभाळणारे श्री.निखिल सर यांनी उत्कृष्ट दर्जाची ध्वनी व्यवस्था उपलब्ध करून दिली. त्यामुळे प्रत्येक कलाकाराचाआवाज स्पष्टपणे आणि प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचला. तसेच व्हिडिओ एडिटर व कराओके क्षेत्रात २५०० गाण्यांचे मोफत कराओके ट्रॅक बनवून देणारे श्री. सुनिल मांजरेकर सर यांनी आपल्या कलात्मक कौशल्याचा सुंदर आविष्कार सादर केला. प्रत्येक गाण्यानुसार योग्य चित्रे, फोटो आणि दृश्ये स्क्रीनवर दाखवून त्यांनी कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संगीत क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्त्व व समाजसेवक श्री. गिरीशजी परमार सर, ए.सी.पी. श्री. किशोरजी शिंदे साहेब आणि फिल्म डायरेक्टर श्री. प्रकाश भालेकर सर उपस्थित होते. त्यांचा ‘स्वर स्वामी कला साधना’ परिवाराच्या वतीनेयथोचित सन्मान व सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे आणखी एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे कार्यक्रम वेळेवर सुरू झाला आणि नियोजित वेळेतच संपन्न झाला. कार्यक्रम हाऊसफुल्ल झाला असूनही रसिक प्रेक्षकांनी शेवटपर्यंत उपस्थित राहून कलाकारांना भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे हा कार्यक्रम खºया अथार्ने सदाबहार, संस्मरणीय आणि अविस्मरणीय ठरला.
प्रत्येक गायक-गायिकेचे फोटो व व्हिडिओ शूटिंग श्री. चरण सिंग सर यांनी अत्यंत समर्थपणे पार पाडले. त्यांच्या उत्कृष्ट छायाचित्रणामुळे कार्यक्रमातील सुंदर क्षण कायमस्वरूपी जतन झाले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी योगदान देणारे सर्व आयोजक, गायकगायिका, मान्यवर पाहुणे, रसिक प्रेक्षक, सरस्वती आॅडिटोरियम गोकुळ हॉलचे व्यवस्थापक व कर्मचारी यांचे मन:पूर्वक आभार व्यक्त करण्यात आले. शेवटी सुरेल मेलडी गीतांनी कार्यक्रमाचा सुंदर समारोप करण्यात आला आणि आनंददायी वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली. स्वर स्वामी कला साधना या मंचाद्वारे महानगरपालिका आजी माजी कर्मचारी, निवृत्त इंजिनीअर, डॉक्टर, विद्यार्थी, जेष्ठ नागरिक, उद्योगपती अशा समाजातील विविध स्तरातील गायक गायिका यांना आपली कला सादर करता येते हेच या ग्रुप चे वैशिष्ट्य आहे. “खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो” हा कार्यक्रम संगीतप्रेमींच्या हृदयात कायमस्वरूपी घर करून गेला. उत्कृष्ट नियोजन, सुरेल सादरीकरण, दर्जेदार ध्वनी व्यवस्था आणि रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद यामुळे हा कार्यक्रम खरोखरच सदाबहार आणि अविस्मरणीय ठरला.