प्रा. संजय लेनगुरे गुरुरत्न पुरस्काराने सम्मानित

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : गडचिरोली जिल्हा जन्मभूमी असलेले व सध्या न.प.नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय तुमसर, जिल्हा भंडारा येथे कार्यरत असलेले मराठी विषयाचे उच्च माध्यमिक शिक्षक संजय एन लेनगुरे यांना सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात काम करीत असलेल्या औदुंबर बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण संस्था नागपूरच्या वतीने दिनांक १३ सप्टेंबर २०२६ ला वसंतराव देशपांडे सभागृह नागपूर येथे, आयोजित गुणगौरव सोहळ्यात गुरुरत्न पुरस्कार- २०२६ देऊन सम्मानित करण्यात आले.

शैक्षणिक, सामाजिक व संघटनात्मक क्षेत्रात काम करीत असलेले प्रा. संजय लेनगुरे तुमसर, यांची प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे कार्याचा आढावा घेऊन, त्यांना विदर्भस्तरीय गुरुरत्न पुरस्कार देऊन सम्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे स्वरूप सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, सन्मान शाल व भेटवस्तू असे होते. तसेच या ठिकाणी इतर मान्यवरांनाही पुरस्कार देऊन सम्मानित केले.

सदर गुणगौरव सोहळा, औदुंबर संस्थेच्या सचिव श्रीमती भाग्यश्री पवार, नागपूर चे आमदार विकास ठाकरे, माजी आमदार सुधाकर कोहळे, माजी शिक्षणाधिकारी रमेश हरडे, मनोज कुंभारे, श्रीमती माधुरी पालीवाल, अनिल शिवणकर, डॉ. पितांबर उरकुडे यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

प्रा. संजय लेनगुरे यांच्या निवडीबद्दल औदुंबर शिक्षण संस्थेचे सर्व पदाधिकारी, पुरस्कार निवड समितीचे सर्व सदस्य, विजुक्ता अध्यक्ष डॉ. अविनाश बोर्डे, महासचिव डॉ. अशोक गव्हाळकर डॉ. अभिजीत पोटले, डॉ. शालिनी तेलरांधे यांच्यासह केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, विजुक्ता भंडारा पदाधिकारी, गडचिरोली जिल्हा माळी समाज संघटना, अखिल भारतीय माळी महासंघ भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा यांचे पदाधिकारी, प्रा.बाळासाहेब माने यांच्यासह मराठी महासंघाचे सर्व पदाधिकारी, शाळा बचाव समन्वय समिती भंडारा चे पदाधिकारी, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे पदाधिकारी, क्षत्रिय कोसरे माळी समाज (विदर्भ) नागपूरचे पदाधिकारी इत्यादींनी तसेच मित्रपरिवार व आप्तस्वकीयानी अभिनंदन केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *