भंडारा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांती दिन उत्साहात साजरा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : भंडारा शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने क्रांती दिनानिमित्त शास्त्री चौक येथील हुतात्मा स्मारक येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी हुतात्मा स्मारकास पुष्पहार अर्पण करून देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाºया हुतात्म्यांना भावपूर्ण अभिवादन करण्यात आले. स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारकांच्या त्यागाचे स्मरण करून त्यांच्या विचारांपासून प्रेरणा घेण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला. तसेच देशाची एकता, अखंडता आणि लोकशाही मूल्ये अधिक बळकट करण्यासाठी सर्वांनी योगदान देण्याचे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमास नगरसेवक कमल साठवणे, तालुका अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे, माजी नगरसेवक पृथ्वी तांडेकर, नरेंद्र साकोरे, नाहिद परवेज, किशोर राऊत, बंटी शिरसागर, शेखर ईश्वरकर, नागदेवे, फारूक शेख, कन्या जंगले, गणेश माळेवार यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन भंडारा शहर काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष धनराज साठवणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *