भरधाव पिकअपची मोटारसायकलला धडक; वडिलांचा मृत्यू, चालकाविरुद्ध गुन्हा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : तुमसर तालुक्यातील देव्हाडी उड्डाणपुलाजवळ भरधाव पिकअप वाहनाने मोटारसायकलला दिलेल्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी तुमसर पोलिसांनी चालकाविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७ आॅगस्ट रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास देव्हाडी उड्डाणपुलाजवळ ही घटना घडली. पांढºया रंगाच्या पिकअप (क्रमांक एमएच-३२ एएल-५१७०) चालकाने निष्काळजीपणे वाहन चालवून होंडा डिलक्स मोटारसायकल (क्रमांक एमएच-३६ टीएच६९२६) ला धडक दिली. या अपघातात पृथ्वीराज वसंता इलपाते (वय ४२, रा. उंकारा, ता. साकोली) यांचे वडील गंभीर जखमी होऊन मृत्यूमुखी पडले. फिर्यादीच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन तुमसर येथे कलम २८१, १०६(१) भा.न्या.सं. २०२३ सहकलम १८४ मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *