मध्यान्ह भोजन योजनेतील अन्नाची गुणवत्ता चांगली ठेवा – खा. डॉ. प्रशांत पडोळ

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : शालेय पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे भोजन दिले जाते. शासनाने ठरवून दिलेल्या निर्देशानुसार सर्व शाळांमध्ये मध्यान्ह आहार देण्याची व्यवस्था केली जाते. मात्र या योजनेमधील अन्नाची गुणवत्ता तपासण्यासाठी शाळेत जेवण झाल्यावर ते शाळा व्यवस्थापन समिती व शिक्षणाचे उपस्थित तपासले पाहिजे तसेच अन्नाचे नमुने सुरक्षित ठेवण्याची आणि अन्नाची गुणवत्ता चांगली ठेवण्याची निर्देश खासदार प्रशांत पडोळे यांनी आज दिले. जिल्हा नियोजन सभागृहात आज जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) समितीची बैठक संपन्न झाली या बैठकीला खासदार डॉ. प्रशांत पडोळे, खासदार राजेंद्र जैन, आमदार अविनाश ब्राह्मणकर, आमदार राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी सावन कुमार मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद कुमार साळवे उपवनसंरक्षक योगेंद्र सिंह उपस्थित होते.

जिल्ह्यातील उज्वला योजनेंतर्गत आतापर्यंत ९६ हजार ३२८ गॅस कलेक्शन देण्यात आले आहेत सध्या नवीन कनेक्शन देण्यासाठी योजना अंतर्गत तीन लाखापर्र्यंत कनेक्शन देण्याची उद्दिष्टे ठेवण्यात आली आहे, जिल्ह्यात गॅस पुरवठा सुरळीत असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी श्री. ठाकरे यांनी दिली. त्यावेळी विविध विभागांचा आढावा खासदार महोदयांनी घेतला. त्यामध्ये जिल्ह्यातील कलावंतांना मानधन योजनेबाबत गतीने काम करण्याची निर्देश त्यांनी उपमुख्य कार्यकारी पंचायत श्री. नंदागवळी यांनी दिले. वरठी बसस्थानकाबाबत आमदार राजू कारेमोरे यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यावर राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकासाठी जागेचा शोध सुरू असल्याचे राज्य परिवहन विभागाच्या संबंधित अधिकाºयांनी सांगितले.

या बैठकीमध्ये पिक विमा योजना, स्वच्छ भारत मिशन, मध्यान पोषण आहार, खरीप पीक वाटप योजना बाबत आढावा घेण्यात आला. स्मार्ट मीटर बाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर संभ्रम असून वीज देयक जास्त येत असल्याबाबत तक्रारी चांगली ठेवा – खा. डॉ. प्रशांत पडोळे प्राप्त झाल्या आहेत, त्याबाबत ग्रामपातळीवर शिबिरे घेऊन नागरिकांना या विषयासंबंधित जाणीव जागृती करण्याचे निर्देश खासदार श्री. पडोळे यांनी महावितरणला दिले दिले. जिल्ह्यात धानपिका व्यतिरिक्त देखील पिक वैविध्य साठी जिल्हा कृषी अधिक्षक कार्यालयातर्फे केलेल्या प्रयत्नांची केलेल्या कामांची माहिती द्यावी खासदार श्री. पडोळे घेतली. यावेळी सध्या शेतीमध्ये पिकांचे विविधीकरण साठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न असून जिल्ह्यात मका लागवड वाढली असल्याचे जिल्हा कृषी अधीक्षक श्रीमती माने यांनी सांगितले. दिशा समितीच्या बैठकीला अधिकाºयांनी गांभीर्याने घेतले पाहिजे व खासदार तथा लोकप्रतिनिधी मागितलेली माहिती त्यांना वेळ सादर केली पाहिजे असे स्पष्ट निर्देश खासदार श्री.पडोळे यांनी दिले.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *