भंडारा पत्रिका/वार्ताहर गर्रा-बघेडा : गोबरवाही पोलीस ठाणे हद्दीत मोटारपंप, ट्रॅक्टरच्या बॅटºया व तांब्याची चोरी करणाºया तिघांना पोलिसांनी अटक केली. या कारवाईत पोलिसांनी एक मोटारपंप, दोन ट्रॅक्टरच्या बॅटºया तसेच अंदाजे पाच किलो तांबे असा एकूण २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गोबरवाही पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अपराध क्रमांक ४१८/२०२६, कलम ३०३(२) अंतर्गत तपासादरम्यान पोलिसांनी राहुल लालचंद नागपुरे (वय २१), हर्षद कुमार संजय नागपुरे (वय १८) आणि रामप्रसाद लेकचंद इठर नागपुरे (वय २८), तिघेही रा. आष्टी, ता. तुमसर यांना अटक केली. आरोपींकडून ३ हजार रुपये किमतीचा एक मोटारपंप, १६ हजार रुपये किमतीच्या दोन ट्रॅक्टरच्या बॅटºया आणि अंदाजे ५ हजार ५०० रुपये किमतीचे पाच किलो तांबे, असा एकूण २४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांच्या पोलीस कोठडीत आणखी दोन दिवसांची वाढ (ढउफ) करण्यात आली आहे. चोरीच्या या प्रकरणाचा पुढील तपास गोबरवाही पोलीस करीत आहेत.