राजेंद्र जैन यांनी घेतली राज्यसभा सदस्य पदाची शपथ

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : आज नवी दिल्ली येथे देशाचे उपराष्ट्रपती तथा राज्यसभा सभापती श्री. सी.पी. राधाकृष्णन यांनी खासदार राजेंद्र जैन यांना राज्यसभा सदस्य पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. या दरम्यान खासदार प्रफुल पटेल यांच्या निवासस्थानी भेटून मान्यवरांनी राजेंद्र जैन यांना राज्यसभा सदस्य म्हणून यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देत लोकशाहीच्या मजबुतीकरिता व राज्याच्या विकासात आपला अमूल्य योगदान व उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा दिल्यात. यावेळी उपस्थित आमदार परिणय फुके, आमदार राजूभाऊ कारेमोरे, आमदार अविनाश ब्राह्मणकर, राष्ट्रवादी कांग्रेसचे राष्ट्रीय नेता अविनाश आदिक, सुनील फुंडे, विनोद जैन, धनंजय दलाल, सुनील जैन, गजराज जैन, अरुण काला, देवेंद्रनाथ चौबे, सुमित हेडा, अविनाश काशिवार, केतन तुरकर सह मान्यवरांनी संसदीय कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *