भंडारा पत्रिका / प्रतिनिधी गोंदिया :- शिक्षक कृती महासंघाच्या नेतृत्वाखाली आज राज्यभर शाळा बंद आंदोलन करण्यात आले. गोंदियात शेकडोच्या संख्ये प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र आले. या वेळी आंदोलन करणाºया शिक्षकांनी शासनाने काढलेल्या जीआर रद्द करा, शाळा वाचवा, शिक्षण वाचवा, च्या घोषणा देत धरणे आंदोला करण्यात आला. या आंदोलनात १ एप्रिल २०१३ पूर्वीच्या शिक्षकांसाठी ळएळ निर्णयाची अंमलबजावणी, शिक्षकांना इछड व अशैक्षणिक कामांमधून मुक्ती, संचमान्यतेतील अन्याय रद्द करून शिक्षक भरती, सरसकट वेतनश्रेणी व शिशुसेवक योजना रद्द अश्या विविध मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना यांच्या नावाने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे. तर मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देखील या आंदोलन वेळी शिक्षकांकडून देण्यात आला.
हे आंदोलन केवळ शिक्षकांसाठी नसून ग्रामीण शिक्षण व विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी असल्याचे शिक्षकांनी आंदोलनात सांगितले आहे. यावेळी समन्वयक एस यू वंजारी,शिक्षक समिती जिल्हाध्यक्ष संदीप तिडके, विभागीय अध्यक्ष किशोर डोंगरवार, शिक्षक भारती विभागीय अध्यक्ष प्रकाश ब्रम्हणकर,जिल्हाध्यक्ष विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ ओ एस बिसेन, जिल्हाध्यक्ष कास्ट्राइब संघटना संजय उके, जिल्हाध्यक्ष हरिराम येरणे पुरोगामी संघटना, शुशील बंसोड अध्यक्ष, राज कडव माजी जिल्हाध्यक्ष जुनी पेन्शन संघटना, जयेश लिल्हारे सचिव जुनी पेन्शन संघटना,संदीप मेश्राम, सुरेंद्र भैसारे, संतोष डोंगरे अशोक बिसेन, ममता येडे, ममता चुटे, मीनाक्षी पंधरे यासह शिक्षक कृती महासंघाचे पदाधिकारी उपस्थित होते.