जिल्हाभरात गणेशोत्सवाची धामधूम : राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची स्पर्धा
भंडारा पत्रिका/प्रतिनिधी
भंडारा : गणेशोत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी आणि गणेश मंडळच्या सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्यावतीने महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
यावर्षी या स्पर्धेचा विस्तार केवळ राज्यपुरता मर्यादित न ठेवता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील गणेश मंडळांना बाप्पाच्या सेवेसोबतच कोट्यवधी रुपयांची बक्षीसे जिंकण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. स्पर्धा कालावधीत गणेशोत्सव मंडळ्नी सामाजिक, पर्यावरणभिमुख आणि सांस्कृतिक क्षेत्रात केलेले उत्कृष्ट काम पारखले जाणार आहे. जिल्ह्यातील मंडळ्नी यात मोठ्या संख्यене सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाड्यावतीने करण्यात आले आहे, अशात आता स्पर्धेमुळे मंडळांची जबाबदारी वाढणार आहे.
आंतरराष्ट्रीय ते तालुका स्तरपर्यंत मंडळांना पारितोषिक मिळणार
या स्पर्धेत तालुका, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय अशा सर्व स्तरावर कोट्यवधी रुपयांची रोख पारितोषिके आणि मानचिन्ह दिले जाणार आहेत. राज्य स्तरावरील प्रथम विजेता मंडळाला पाच लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार आहे. तर तालुका व जिल्हा स्तरवरही भरघोस बक्षीसे ठेवण्यात आली आहेत. महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला राज्य महोत्सव म्हणून घोषित केले आहे. यामुळे या सणाचा उत्साह आणि व्याप्ती जगभरात पोहोचلی आहे.
कोणत्या गोष्टीसाठी मंडळांना किती गुण?
गणेश मंडळांचे मूल्यमापन करण्यासाठी एकूण १०० गुण निर्धारित करण्यात आले आहेत. यात पर्यावरणपूरक मूर्ती सजावट २० गुण, सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रम (रक्तदान शिबिर आरोग्य शिविर इत्यादी) २० गुण, ध्यन व प्रकाश प्रदूषणचे नियम, नियमांचे पालन १५ गुण, भक्तांसाठी सोयी-सुविधा व सुरक्षितता १५ गुण, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रम १५ गुण, शिस्त, स्वच्छता व सामाजिक सलोखा १५ गुण अशी व्यवस्था करण्यात आली आहे.
राज्यभ्रामध्ये उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे आयोजन
पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या माध्यमातून ही स्पर्धा राबविली जात आहे, गणेशोत्सवातील उपक्रम, सामाजिक भान आणि सृष्टीमधील कल्पकता यांचा गौरव करणे हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे. मागील वर्षीही ही स्पर्धा घेण्यात आली होती, यंदाही घेतली जात आहे.
ऑनलाइन अर्ज करण्याची सुविधा केलीय उपलब्ध.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रं मंडळ्ना सांस्कृतिक कार्य विभागाच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागत आहे. अर्ज प्रक्रिया अत्यंत सुलभर करण्यात आली असून आवश्यक कागदपत्र व उपक्रमांची माहिती ऑनलाइन अपलोड करावी. वारसा जपण्यासोबत समाजाला एकत्र आणण्यासाठी राज्य सरकारतर्फे या महोत्सवाला विशेष दर्जा व पाठबळ दिले जात आहे.