भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाच्या अधिकृत अकाउंट वरून राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह व अवमानकारक वक्तव्याचा भंडारा शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर निषेध नोंदविण्यात आला. गांधी चौक भंडारा येथे महात्मा गांधी यांच्या प्रतिमेसमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार प्रफुलभाई पटेल व खासदार राजेंद्र जैन यांच्या निर्देशानुसार जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे व प्रदेश महासचिव धनंजय दलाल यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाच्या वतीने केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. पुरोगामी महाराष्ट्रात महिलांचा अवमान कधीही स्वीकारला जाणार नाही.
हा केवळ सुनेत्राताईंचा नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेचा अपमान आहे. त्यामुळे काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेल्या आक्षेपार्हव अवमानकारक वक्तव्याचा तीव्र निषेध करून महाराष्ट्रातील सर्व महिलांची सार्वजनिक माफी काँग्रेस पक्षाने मागावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला जिल्हाध्यक्ष सरिताताई मदनकर, डॉ. रवींद्र वानखेडे, डॉ.श्रीकांत वैरागडे, डॉ. जगदीश निंबार्ते, हेमंत महाकाळकर, नरेंद्र झंझाड, प्रशांत देशकर, राजू सलाम पटेल, शेखर (बाळाभाऊ ) गभने, मनीष वासनिक, सुनील साखरकर, राजेश वासनिक, कीर्ती गणवीर, मंजुषा बुरडे, महेंद्र वाहने, सोहेल अहमद, गणेश चौधरी, अमन मेश्राम, विक्रम उजवणे, विजय खेडेकर, भानुदास बनकर, खुशाल निपाने, महेश जगनाडे, पंकज काळे, फरहान पटेल, धनंजय ढगे, थामदेव निमजे, धनवंता बोरकर व पदाधिकारी-कार्यकर्ता उपस्थित होते.