राहुल गांधींच्या प्रश्नांना उत्तर द्या, काँग्रेसवर टीका नको !

SIR च्या मुद्द्यावर मुकुंद साखरकर यांचे भाजपला प्रत्युत्तर

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी

भंडारा : SIR (Special Intensive Revision) संदर्भात राहुल गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर भाजपकडून काँग्रेसवर करण्यात आलेल्या टीकेला भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुकुंद विनोद साखरकर यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

‘राहुल गांधी यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी काँग्रेसवर टीका का केली जात आहे?’ असा सवाल साखरकर यांनी केला. SIR चा थेट संबंध मतदार यादी व मतदानाच्या अधिकाराशी असल्याने या प्रक्रियेबाबत प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक असल्याचे त्यांनी म्हटले.

२६ सप्टेंबर रोजी निवडणूक आयोगाने रक्कम प्रक्रियेत काही बदल जाहीर केले असून, महाराष्ट्रातील दावे व हरकती दाखल करण्याची मुदत १२ ऑक्टोबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर प्रक्रियेत बदल करण्याची गरज का निर्माण झाली, असा प्रश्न साखरकर यांनी उपस्थित केला. भाजपचे जिल्हाध्यक्ष हे निवडणूक आयोगाचे अधिकृत प्रवक्ते नसल्याचे सांगत, निवडणूक प्रक्रियेबाबतच्या प्रश्नांची अधिकृत उत्तरे निवडणूक आयोगानेच द्यावीत, अशी मागणी त्यांनी केली.

पात्र मतदाराचे नाव वगळले जाऊ नये, नागरिकांना आपली बाजू मांडण्याची संधी मिळावी आणि रकम्षी प्रक्रिया पारदर्शक असावी, अशी काँग्रेसची भूमिका असल्याचे मुकुंद साखरकर यांनी स्पष्ट केले.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *