लाखनी नगरपंचायतीच्या उपाध्यक्षांनंतर अध्यक्षांवरही अविश्वास पारित

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी
लाखनी:- स्थानिक नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष त्रिवेणी मनोज पोहरकर व उपाध्यक्ष लता रमेश रोडे यांच्यावर १३ नगरसेवकांनी अविश्वास प्रस्ताव १ जुलै रोजी जिल्हाधिकारी भंडारा व नगराध्यक्ष यांचेकडे दाखल केला होता. त्या संदर्भात आज मंगळवारी (ता. ७) ला विशेष सभेचे आयोजन अध्यासी अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी स्वाती देसाई यांच्या उपस्थितीत करण्यात आले होते. त्यामध्ये अध्यक्ष यांच्या विरुद्ध १४ नगरसेवकांनी मतदान केले तर अध्यक्ष यांच्या बाजूने एकही नगरसेवकांनी पाठिंबा दर्शविला नाही.

अविश्वास पारित नंतर पत्रकार परिषद
लाखनी नगरपंचायतीच्या १३ नगरसेवकांनी दाखल केलेल्या अविश्वास पारित झाल्यानंतर १४ ही नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेत आपली कैफियत मांडली. अध्यक्षांचा पतीचा व उपाध्यक्षांचा मुलाचा नगरपंचायत प्रशासनात हस्तक्षेप असल्याचे सांगितले. आता सर्व पक्षीय नगरसेवक एकत्र येऊन लाखनी शहराचा विकास करणार असल्याचे माहिती दिली. १४ विरुद्ध ० मतांनी अविश्वास ठराव पारित झाला.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून १७ सदस्य लाखनी नगरपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक डिसेंबर २०२१ व जानेवारी २०२२ अशा दोन टप्प्यात पार पडली होती. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे ८, भाजप ६, काँग्रेस २ व अपक्ष १ असे एकूण १७ नगरसेवक निवडून आले होते. नगराध्यक्षपद अनुसूचित जाती (महिला) साठी आरक्षित असल्याने नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या त्रिवेणी पोहरकर यांची नगराध्यक्षपदी वर्णी लागली होती. तर उपाध्यक्ष प्रदीप तितीरमारे यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर भाजपच्या लता रोडे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली होती.

bhandarapatrika

bhandarapatrika

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *