विदर्भातून हजारो कार्यकर्ते जाणार सावित्रीबाई फुले यांच्या जन्मगावी

भंडारा पत्रिका / प्रतिनिधी भंडारा : शनिवार, ३ जानेवारी रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगावला शासनाने १४३ कोटी रुपये मंजूर करून त्या ठिकाणी महिलांसाठी प्रशिक्षण केंद्र व सावित्रीबाईंचे राष्ट्रीय स्मारक करण्याचे ध्येय ठेवले आहे. महिला सक्षमीकरणाचा केंद्रबिंदू म्हणून नायगाव उभे राहणार असून नायगावला राष्ट्रीय महोत्सव शनिवार, ३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता साजरा होणार आहे. यासाठी विदर्भातुन हजारो कार्यकर्ते सावित्रीबाई फुलेंच्या जन्मगावी पोहोचणार आहेत.

महिला प्रशिक्षण केंद्र व राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार, जयकुमार गोरे, छगन भुजबळ, अतुल सावे, पंकजा मुंडे, शंभूराजे देसाई हे मंत्री व इतर अनेक गणमान्य उपस्थित राहणार आहेत. या राष्ट्रीय महोत्सवाला विदर्भातुन अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. राजेंद्र महाडोळे यांच्या नेतृत्वात ७ हजार कार्यकर्ते १०० बसेसने पोहचणार असून संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. सर्वांनी या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन अ. भा. माळी महासंघाचे भंडारा जिल्हाध्यक्ष विजय शहारे, नेपाली चिचमलकर, अनिल डोंगरवार, शंकर राऊत, श्रीकांत भुसारी, गोंदिया जिल्हाध्यक्ष गायत्री इरले, विष्णू नागरीकर, देविदास गुरनुले, चंद्रपूर जिल्हाध्यक्ष गुलाब शेंडे, नंदकिशोर बारस्कर आदिंनी केले आहे.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *