विविध कार्यालयांची पाहणी, नागरिकांशी संवाद व वृक्षारोपण अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांचा भंडारा दौरा

भंडारा पत्रिका/प्रतिनिधी भंडारा : महाराष्ट्र शासनाचे अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी शुक्रवारी भंडारा जिल्ह्याचा दौरा करून महसूल विभागाच्या विविध कार्यालयांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी कार्यालयांतील अभिलेख व दस्तऐवजांचे व्यवस्थापन, नागरिकांना दिल्या जाणाºया सेवा तसेच प्रशासकीय कामकाजाची सविस्तर पाहणी केली. विविध कार्यालयांतील अधिकाºयांना कामकाज अधिक गतिमान, पारदर्शक व नागरिकाभिमुख करण्याच्या सूचना देतानाच भेटीदरम्यान उपस्थित नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी व सूचना जाणून घेतल्या. दौºयाच्या प्रारंभी श्री. खारगे यांनी भंडारा येथील उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयाला भेट देऊन दैनंदिन कामकाजाची पाहणी केली. यावेळी उपनिबंधक प्रकाश ढगे यांनी कार्यालयाच्या दैनंदिन कामकाजाची, अभिलेख व्यवस्थापनाची तसेच नागरिकांना दिल्या जाणाºया सेवांची सविस्तर माहिती श्री. खारगे यांना दिली. त्यानंतर त्यांनी मोहाडी तहसील कार्यालय, सेतू केंद्र तसेच आंधळगाव येथील टसर सिल्क युनिटला भेट देऊन तेथील कार्यपद्धती, उत्पादन प्रक्रिया व सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती घेतली.

संबंधित अधिकाºयांशी चर्चा करून आवश्यक सूचना त्यांनी दिल्या. त्यानंतर श्री. खारगे यांनी तुमसर येथील उपनिबंधक (मुद्रांक) कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालयाला भेट दिली. उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या परिसरात त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी तुमसर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजू कारेमोरे यांनी श्री. खारगे यांची भेट घेऊन विविध स्थानिक विकासकामे व महसूल विभागाशी संबंधित विषयांवर चर्चा केली. संपूर्ण दौºयादरम्यान जिल्हाधिकारी सावन कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी मनोहर चव्हाण तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी यांच्यासोबत उपस्थित होते. विविध ठिकाणच्या पाहणीदरम्यान त्यांनी अधिकाºयांशी सविस्तर चर्चा केली, आवश्यक सूचना दिल्या तसेच उपस्थित नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या, सूचना व अपेक्षा जाणून घेतल्या.

administratar

administratar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *